देवळाली प्रवरा/वेबटीम:- संपूर्ण जगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी होत असताना देवळाली प्रवरा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
संपूर्ण जगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी होत असताना देवळाली प्रवरा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि सुरेंद्र थोरात मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करून अभिवादन करण्यात आले.
राजवाडा चौक येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रसंगी आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात,सौ. सरूबाई वामन संसारे बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट यांचे उपाध्यक्ष स्वप्नील संसारे, माजी नगरसेविका सुनीता थोरात, मेजर रवी संसारे, हॉटेल क्रांती चे मालक श्री किशोर पंडित,राजू थोरात,मराठा ग्रुप चे अध्यक्ष दासू पठारे, कांदा आडत व्यापारी सिद्धार्थ कांबळे, प्रमोद गायकवाड, यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंती निमित्त सौं. सरूबाई वामन संसारे बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट यांच्या तर्फे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना मोफत अभयसिका सुरु करण्याचे आश्वासन स्वप्नील संसारे यांनी दिले.
बाबासाहेबांच्या फ्लेक्स वरती बाबासाहेबांचा फोटो व्यतिरिक्त कोणाचाच फोटो नसावा हे या जयंतीचे वैशिष्ट्य असावे असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी दाखवून एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला आहे.
राजवाडा चौक येथून अभिवादन करून पुढे प्रत्येक चौकात फटाके वाजवून मिरवणूक काढण्यात आली. बाजारतळ येथे अनेक मान्यवरांची भाषणे होऊन आणि मिठाई वाटप करून जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रसंगी कु. ऋचा थोरात, वर्षा संसारे, संदीप पंडित, रोहित पंडित, देशमुख यांची भाषणे झाली.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप पंडित, उपाध्यक्ष आकाश संसारे, राकेश संसारे, सागर मोहन संसारे, सचिन बोर्डे, रोहित पंडित, सागर फ्रँसीस संसारे, पंकज संसारे, कुणाल आढाव, दिगंत पंडित, सुदेश पंडित, महेश पंडित, विशाल पंडित, वैभव संसारे, नयन संसारे,प्रशांत संसारे, प्रथमेश पंडित आदिंसह माजी नगरसेविका सुनीता थोरात,आक्का थोरात, रेखा संसारे, तृप्ती संसारे, वर्षा संसारे, नंदाबाई पंडित, उज्वला संसारे आदी महिलांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. संदीप पंडित यांनी केले आणि आभार रोहित पंडित यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत