राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव निमित्ताने ग्रंथराज ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संत एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण कथेचे शनिवार दि. ५ ते शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्ताने दररोज पहाटे ५ ते ६ काकड, ६.३० ते ७ विष्णुसहस्त्रनाम, सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प बाळकृष्ण महाराज खांदे यांच्या सुश्राव्यवाणीतून भाविकांना भावार्थ रामायण कथा श्रवण करण्याची संधी व नंतर महाप्रसाद पंगत असणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प रोहिदास महाराज सांगळे हे जबाबदारी निभावणार आहे.
दरम्यान ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ९ यावेत ह.भ.प किरण महाराज गागरे यांचे हरिकीर्तन तर या सोहळ्याची सांगता शनिवार दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. पोपट महाराज वांबोरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने महाप्रसाद सोहळ्याने होणार आहे.
या सप्ताहासाठी परिसरातील दानशूर मंडळी व भाविक भक्तांचे सहकार्य लाभणार आहे. दरम्यान प्रसाद नगर येथील हनुमान मंदिरात गेल्या अडीच ते तीन वर्षापासून दर शनिवारी सामूहिक हनुमान चालीसा पठण व त्यानंतर खिचडी प्रसादाचे वाटप केले जाते. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान दक्षिणमुखी हनुमान मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत