देवळाली प्रवरात अवैध गावठी दारू अड्ड्यांवर राहुरी पोलिसांकडून छापे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात अवैध गावठी दारू अड्ड्यांवर राहुरी पोलिसांकडून छापे

  देवळाली प्रवरा(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील  देवळाली प्रवरात छुप्या पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू तयार करून तिची विक्री करत असल्याबाबत माह...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील  देवळाली प्रवरात छुप्या पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू तयार करून तिची विक्री करत असल्याबाबत माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्याने त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी देवळाली प्रवरा येथे छापा टाकला असता  गणेश रमेश गायकवाड याच्या ताब्यात २० हजार रुपये किंमतीचे दारू तयार करण्याचे रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू मिळून आली.


  तसेच दुसऱ्या ठिकाणी  रवींद्र दिगंबर डुकरे (राहणार टाकळीमिया रोड, देवळाली प्रवरा) याच्या कडे छापा टाकला असता त्याच्या ताब्यात १७ हजार रुपये किंमतीची दारू तयार करण्याचे रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू मिळून आल्याने दोन्ही हातभट्ट्या नाश करून आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.



         तसेच देवळाली प्रवरा गावातील बाजार तळावर देशी दारूची चोरटी विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी नामे ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामकिसन भागवत(राहणार शेटेवाडी रोड देवळाली प्रवरा)  याच्या ताब्यात १ हजार ६१० रुपये किंमतीची देशी दारू भिंगरी संत्राच्या बाटल्या मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे.



            पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पोउपनि. धर्मराज पाटील, पोहेकॉ. बबन राठोड, पोहेकॉ. हनुमंत आव्हाड, पोकॉ. गणेश लिपणे, पोकॉ. शेषराव कुटे, पोकॉ. अंबादास गीते, होमगार्ड शरद कोबरणे रवींद्र कदम  यांच्या पथकाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत