राहुरी फॅक्टरी येथील बैलगाडी यार्ड येथे उद्या शनिवारपासून हरिनाम सप्ताह - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील बैलगाडी यार्ड येथे उद्या शनिवारपासून हरिनाम सप्ताह

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील बैलगाडी यार्ड परिसरातील जुने हनुमान मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव ते हनुमान जन्मोत्सव निमित्तान...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील बैलगाडी यार्ड परिसरातील जुने हनुमान मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव ते हनुमान जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उद्या शनिवार 6 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.


दररोज रोज पहाटे 4 वाजता, 6 ते 7 विष्णूसहस्रनाम 8 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण वाचन सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ 7 ते 9  हरिकीर्तन व त्यानंतर महाप्रसाद पंगत याप्रमाणे कार्यक्रम संपन्न होणार आहे.


शनिवार 5 एप्रिल रोजी अर्चनाताई गिरी जाधव यांचे कीर्तन, रविवार 6 एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता रामनवमीनिमित्व गोविंद महाराज मलिक यांचे कीर्तन व रात्री अनिकेत महाराज बांगर यांची कीर्तन  तर सोमवार 7 एप्रिल रोजी ताहाराबाद येथील संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे,  मंगळवार 8 एप्रिल रोजी सुशील महाराज नाईकवाडे, बुधवार 9 एप्रिल रोजी प्रांजलताई जाधव, गुरुवार 10 एप्रिल रोजी अरुणगिरी महाराज, शुक्रवार 11 एप्रिल रोजी कृष्णानंद नागे महाराज यांचे कीर्तन तसेच शनिवार 12 एप्रिल रोजी कैलास गिरी महाराज सावखेडा यांचे काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.


या सप्ताहासाठी विविध दानशूर मंडळी, हरिभक्त परायण मंडळी, प्रवचनकार, टाळकरी, वारकरी व देणगीदार यांचे सहकार्य लाभणार आहे.


 तरी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत