राहुरी (प्रतिनिधी) जि.प.प्रा.शाळा तांदुळवाडी येथे इ.४ थी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन प्रज्ञा...
राहुरी (प्रतिनिधी)
जि.प.प्रा.शाळा तांदुळवाडी येथे इ.४ थी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला खेडकर होत्या.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ यांनी सांगितले की, शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यात जिव्हाळ्याचा विषय असतो. विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी शाळेबद्दल नेहमी आत्मीयता असते. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे गुणदोष माहिती असल्याने त्यांना पुढे नेण्यास शिक्षकांची भूमिका महत्वाची असते. मुख्याध्यापक प्रभूजी बाचकर यांनी सांगितले की, शाळा आदर्श होण्यास संस्कारक्षम विद्यार्थी, जागृत पालक व दक्ष नागरिक यांचा सहभाग आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या चांगल्या गोष्टीला प्राधान्य द्यावे. शिक्षिका कल्याणी खराडे यांनी सांगितले की, शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविल्याने विद्यार्थांना चालना मिळते. प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकांना महत्वाचा असतो त्यामुळे विद्यार्थी मोठा पदावर पोहोचल्यास गुरूदक्षिणा प्राप्त झाल्यासारखे वाटते. यावेळी मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, नवीन प्रवेश स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी गावातील जेष्ठ मोहनराव खाटेकर, भास्कर चव्हाण, संजय महाराज मोरे, भाऊसाहेब धसाळ, अशोक धसाळ, शाळा समिती उपाध्यक्षा सौ.स्वप्नाली चव्हाण, सदस्य नितीन खडके, अविनाश पेरणे, विक्रम धागुडे, अश्विनी धसाळ, शितल ससाणे, जिजाबाई खाटेकर, यांच्यासह जयश्री धसाळ, द्वारकाबाई खडके, लक्ष्मीबाई ससाणे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. श्रीमती खेडकर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले, शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. मुख्याध्यापक प्रभुजी बाचकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत