राहुरी(वेबटीम) शालेय अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलन हे उत्तम व्यासपीठ असून शेणवडगाव शाळेत पहिल्यांद...
राहुरी(वेबटीम)
शालेय अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलन हे उत्तम व्यासपीठ असून शेणवडगाव शाळेत पहिल्यांदाच स्नेहसंमेलन भरवून विद्यार्थ्यांना चांगली संधी निर्माण करून दिली असल्याचे प्रतिपादन धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान अध्यक्ष राजुभाऊ शेटे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील शेणवडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्नेहसंमेलन प्रसंगी श्री.शेटे बोलत होते. यावेळी माजी आ.भाऊसाहेब कांबळे, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, फिल्म निर्माता गणेश जगदीशन, शिक्षक बँक संचालक गोरक्षनाथ विटनोर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रची लोकधारा जपत गण गवळण, शेतकरी गीत, पोवाडा, लावणी आदिवासी गीत, देशभक्ती गीत या सर्वांची सांगड घालत कलाविष्कार सादर केला. चिमुकल्या ची पावलं थिरकली.
यावेळी गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरपंच ग्रामसेविका यांना भार्गवी मेकओव्हरकडून विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांसठी पार पडलेल्या उखाणा, रांगोळी, पाककृती, संगीत खुर्ची या स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. उयावेळी सरपंच, उपसरपंच, व सदस्य ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांचे नृत्य दिगदर्शन विकास घोगरे व भार्गवी पुराणिक यांनी तर आभार दीपाली पुराणिक यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत