राहुरी(वेबटीम) राहुरी शहरातील कासार गल्ली येथील सामाजिक व धार्मिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या श्रीराम नवमी उत्सव समिती राहुरी तालुका यां...
राहुरी(वेबटीम)
राहुरी शहरातील कासार गल्ली येथील सामाजिक व धार्मिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या श्रीराम नवमी उत्सव समिती राहुरी तालुका यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी प्रभू श्रीरामांची भव्य-दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती.
यावेळी देखाव्याचे उद्घाटन राहुरी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते शिवाजीराव उर्फ दादा पाटील सोनवणे आणि राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या शोभा यात्रेची खासियत आणि आकर्षण ठरले होते ते मानवी देखावे राम लल्ला आणि बजरंग बली. या देखाव्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी गर्दी केली होती. तसेच या मिरवणुकीत महिलांचा व बालगोपालांचा सहभाग मोठ्या संख्येने होता.
पुण्यातील एस.एम.ऑडिओ डीजे हा प्रमुख आकर्षणाचे केंद्र बनला होता. प्रभू श्रीरामांच्या भक्तीमय गीतांनी भक्तिमय वातावरण तयार झाले होते. तसेच ही मिरवणूक आनंदात भक्तीमय वातावरणात तसेच अतिशय शांततेने पार पडली.
सदर शोभयात्रा पारपडण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले. तसेच यावेळी हेमंत पवार,उमेश वाघ, कमलेश परदेशी,भूषण ढोले,श्रेयस रासने, अक्षय परदेशी,ओंकार देशपांडे,पप्पू थोरात,सागर वारशिंदकर,सुमित धसाळ,प्रमोद भट्टड,गणेश उंडे,प्रसाद परदेशी फोटो सौजन्य रीची सराफ तसेच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत