राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी येथील डॉ बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राहुरी तालुका खरेदी विक्री संघांचे चेअर...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी येथील डॉ बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राहुरी तालुका खरेदी विक्री संघांचे चेअरमन युवराज सुधाकर तनपुरे यांनी उभे रहावे अशी मागणी कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून बंद असलेल्या पण विखे गटाच्या ताब्यात असलेल्या डॉ तनपुरे कारखान्याची निवडणूक मे २०२५ चे आत घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो.
त्यातच दोन दिवसापूर्वी सुधाकर बाबुराव तनपुरे यांना मानणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होऊन तीत खरेदी विक्री संघांचे चेअरमन युवराज तनपुरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी प्रमुख कार्यकर्ते यांनी सुधाकर तनपुरे यांना गळ घातली असून त्यांनीही आपण निवडणूक लढणारच असल्याचे स्पष्ट सांगितले.
युवराज तनपुरे यांनी आपल्या खरेदी विक्री संघांचे चेअरमन पदाच्या काळात खरेदी विक्री संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकला असून कारखान्याची लढविण्याची सर्वच नेत्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी हा कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याठी काय करणार याचे स्पष्टीकरण करावे तरच सभासदाचा त्यावर विश्वास बसेल असे युवराज तनपुरे म्हणाले.
तनपुरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नवीन नेतृत्व तालुक्याच्या राजकारणात येणार आहे. त्यानंतर सुधाकर तनपुरे यांनी अनेक वर्ष खरेदी विक्री संघाचा व राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अनेक वर्ष संचालक म्हणून कारभार पाहत होते. त्यानंतर राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक व खरेदी विक्री संघांचे माजी चेअरमन सुधाकर तनपुरे यांचे सुपुत्र युवराज तनपुरे हे गेल्या ५ ते ६ वर्षांपासून खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी असून त्यांनी संघांचे कारभारात अमूलग्र बदल घडून आणले व जुनी खरेदी विक्री संघाच्या जागेत नवीन व्यापारी संकुल बांधल्याने नगर मनमाड राज्य मार्गांवर तसेच शहराच्या वैभवात भर पडली आहे. युवराज तनपुरे यांचे रूपाने तनपुरे यांच्या तिसऱ्या पिढीतील तिसरे नेतृत्व राजकारणात उतरत आहे.युवराज तनपुरे हे गेल्या दोन वर्षांपासून राहुरी तालुका ऊस वाहतूक ट्रॅक संस्थेचे चेअरमन पदाची व राहुरी तालुका सहकारी मुद्रणालय या संस्थेचेही काम पाहत असून त्यांचा त्या माध्यमातून तालुक्याच्या विविध भागात संपर्क आला आहे. खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून तूर हरभरा, सोयाबीनसाठी शासनाच्या आधारभूत किमतीवर शेतकऱ्यांना योग्य मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत