राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील गुंजाळ नाका नजीक बैलगाडी यार्ड परिसरात असलेल्या जुने हनुमान मंदिरात श्रीराम जन्मोत्सव ते श्री ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील गुंजाळ नाका नजीक बैलगाडी यार्ड परिसरात असलेल्या जुने हनुमान मंदिरात श्रीराम जन्मोत्सव ते श्री हनुमान जन्मोत्सवनिमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची शनिवारी महंत कैलासगिरी महाराज(सावखेडा) यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली.
या सप्ताहानिमित्त गेली ७ दिवस राज्यातील नामांकित किर्तनकारांची किर्तनसेवा, भजन, हरिपाठ, अन्नदान पंगत आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.
शनिवारी कैलासगिरी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून पार पडलेल्या किर्तन सोहळ्यास मोठ्या संख्यने भाविक उपस्थित होते.
या किर्तनास आ.हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन आण्णासाहेब चोथे, व्हा. चेअरमन आबासाहेब वाळुंज, राहुरी निधीचे रामभाऊ काळे, साई सेवा पतसंस्थेचे प्रदीप येवले, उद्योजक ऋषभ लोढा, शशिकांत खाडे, भारत शेटे, संदीप साठे, पारस नहार,डॉ.भाग्यवान, प्रदीप गरड,अशोक मथाजी मुसमाडे आदिंसह भाविक भक्तगण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत