अल्पवयीन मुलाला विहीरीत फेकुन देवुन जिवे ठार मारुन फरार झालेल्या आरोपी 24 तासात गजाआड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अल्पवयीन मुलाला विहीरीत फेकुन देवुन जिवे ठार मारुन फरार झालेल्या आरोपी 24 तासात गजाआड

शेवगाव(शिवलिंग सोनटक्के) दि.21/05/2025 रोजी सायं 06.30 च्या सुमारास अमन शाकीर शेख वय-10 वर्षे तसेच तोफीक सुभान शेख दोघे रा.जुने दहीफळ ता.शेव...

शेवगाव(शिवलिंग सोनटक्के)



दि.21/05/2025 रोजी सायं 06.30 च्या सुमारास अमन शाकीर शेख वय-10 वर्षे तसेच तोफीक सुभान शेख दोघे रा.जुने दहीफळ ता.शेवगाव हे गावातील दहीफळ-घोटण जाणाऱ्या रस्त्याने रनिंग करीत असतांना यातील आरोपी सचिन गोरख भारस्कर व पिनु गंगाराम भारस्कर राहणार जुने दहिफळ ता शेवगाव हे पायी चालत असतांना अमन शाकीर शेख याचा पाय घसरुन सचिन गोरख भारस्कर यांच्या  अंगावर पडल्याने त्याचा त्याला राग येवुन त्याने अमन शेख यास मारहाण करुन रस्त्याचे कडेला असलेल्या विहीरीमध्ये उचलुन फेकुन दिले त्यात त्याचा मृत्य झाला 


यातील फिर्यादी नामे बीबी गुलाब शेख वय-65 रा.जुने दहीफळ ता.शेवगाव जि.अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 


  आरोपी सचिन गोरख भारस्कर  हा गुन्हा केल्यानंतर ताबडतोब फरार झाला होता.मा.पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, आरोपी नेवासा मार्गे पुणे येथे पळुन जाणार असल्याने  पथक तयार करुन त्याचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते.सदर आरोपी हा नेवासा मार्गे पुणे येथे पळुन जात असतांना फत्तेपुर ता.नेवासा शिवारामध्ये पाठलाग करुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. 


        सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे सो अहमदनगर, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री समाधान नागरे, पोहेकॉ चंद्रकांत कुसारे,पोहेकॉ किशारे काळे,पोकॉ शाम गुंजाळ,पोकॉ राहुल खेडकर,पोकॉ संप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत