राहुरीत उद्या रविवारी ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेचे आयोजन विजयी तिरंगा यात्रेत समस्त भारतप्रेमी देशवासीयांनी उपस्तिथ राहावे - आ.शिवाजीराव कर्डिले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत उद्या रविवारी ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेचे आयोजन विजयी तिरंगा यात्रेत समस्त भारतप्रेमी देशवासीयांनी उपस्तिथ राहावे - आ.शिवाजीराव कर्डिले

राहुरी/वेबटीम:- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,कणखर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब  यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली ...

राहुरी/वेबटीम:-

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,कणखर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब  यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांनी ज्या धैर्याने, समर्पणाने आणि शिस्तीने ऑपरेशन सिंदूर पार पाडले ते कौतुकास्पद आहे. देशभर आणि राज्यात सैन्याच्या शौर्याची चर्चा होत आहे. या विजयी यात्रेचे आयोजन करून सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राहुरी येथे रविवार दि.२५ मे रोजी सकाळी ९.०० वाजता "विजयी तिरंगा यात्रेचे" आयोजन करण्यात आले असून यामध्ये माजी सैनिक, महिला, विद्यार्थी, सामाजिक संघटना व देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.
पहलगाव येथे दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांवर हल्ला करत मृत्युमुखी पाडले त्याला प्रतिउत्तर म्हणून भारतीय सैनिकांनी "मिशन सिंदुर" राबवून ठोस उत्तर दिले आहे. त्यामुळे राहुरी येथे "विजयी तिरंगा यात्रेचे" आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माजी सैनिक, महिला, विद्यार्थी, सामाजिक संघटना व देशभक्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ.कर्डिले यांनी केले.
विजयी तिरंगा यात्रेसाठी रविवारी २५ मे रोजी सकाळ ९ वाजता सर्वानी नगर - मनमाड रोड वरील  खरेदी विक्री संघ,प्रागंणात जमा व्हावे त्या नंतर विजयी तिरंगा यात्रेला खरेदी विक्री संघ पासून सुरुवात होऊन मल्हारवाडी चौक, पृथ्वी कॉर्नर, शुक्लेश्वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनि चौक, जुना सरकारी दवाखाना समोर समारोप करण्यात येईल अशी माहिती आ.शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत