कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा नाशिक विभागात द्वितीय क्रमांक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा नाशिक विभागात द्वितीय क्रमांक

अहिल्यानगर(वेबटीम) महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात पोलीस विभागात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अहिल्यानगर...

अहिल्यानगर(वेबटीम)



महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात पोलीस विभागात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  प्रताप दराडे यांना नाशिक विभागात द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.



   १०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्तव्य पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य शासनाने नाशिक विभागात द्वितीय क्रमांक जाहीर केला आहे.


याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रताप दराडे यांचे अभिनंदन केले आहे. तर अहिल्यानगर शहरचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती  यांनी प्रताप दराडे यांचा सन्मान केला. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


पोलीस निरीक्षक दराडेंचे कार्य उल्लेखनीय

 आपल्या कार्याच्या अनोख्या पद्धतीमुळे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी जनमानसात वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. दराडे यांनी राहुरीत काम करत असताना आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता.मात्र एका प्रकरणात त्यांची बदली करण्यात आली. यावेळी राहुरीकरांनी त्यांच्या बदलीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरली होती. बहुदा पोलिसांच्या बदलीसाठी रास्ता रोको ,आंदोलन होतात . मात्र दराडे यांची बदली झाल्यामुळे राहुरीत झालेले आंदोलन हे राज्य पातळीवर चर्चेचा विषय ठरला होता. दराडे यांनी त्यानंतर अहिल्यानगर कोतवाली पोलीस ठाण्याचा पदभार घेऊन धडाकेबाज कारवाई करून गुन्हेगारांत वचक निर्माण केल्याचे दिसून आले. आता शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत