राहुरी फॅक्टरी(वेबटीम) वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील विविध शाळांत १० वी व १२ वी च्या परीक्षेत ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील विविध शाळांत १० वी व १२ वी च्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
वैष्णवी चौक परिसरातील योगा भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमास साई आदर्श मल्टी स्टेटचे अध्यक्ष शिवाप्पा कपाळे, माजी सनदी अधिकारी दत्ता कडु,माजी नगरसेविका सुजाता कदम,पंचायत समिती राहुरी येथील उज्वला कल्हापुरे,गोंदिया जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका सोनाली कदम, शिवचरित्रकार हसन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थापक अध्यक्ष वसंत कदम यांनी केले. प्रसंगी देवळाली प्रवरा येथील ऐश्वर्या बाबासाहेब कराळे या तरुणीची बृहन्मुंबई महानगरपालिका येथे टॅक्स इन्स्पेक्टरपदी निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा, न्यू इंग्लिश स्कुल, देवळाली प्रवरा, वाणी सेंट्रल स्कुल, तांभेरे, डिपॉल इंग्लिश मिडीयम स्कुल, राहुरी फॅक्टरी, छत्रपती शिवाजी हायस्कुल, राहुरी फॅक्टरी, नूतन माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा आदी शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय विटनोर यांनी केले तर आभार हसन सय्यद यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसंत कदम,अमोल कदम,जालिंदर दोंड,महेंद्र दोंड,अश्विन कदम,मयुर मोरे, मनोज गावडे,संतोष कदम,बाबासाहेब खांदे,सुजित लोंढे,तेजस तुपे,सोहम कदम आदींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत