१०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम मध्ये नेवासा पंचायत समितीचा नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

१०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम मध्ये नेवासा पंचायत समितीचा नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक

नेवासा (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम" अंतर्गत नेवासा पंचायत समितीने नाशिक विभागातून गौरवपूर्ण द्व...

नेवासा (प्रतिनिधी)



राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम" अंतर्गत नेवासा पंचायत समितीने नाशिक विभागातून गौरवपूर्ण द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी संपूर्ण नेवासा तालुक्यासाठी अभिमानास्पद असून, कार्यक्षम प्रशासन आणि टीमवर्कचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.


या यशामागे सतत मार्गदर्शन करणारे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सर यांचे मन:पूर्वक आभार. तसेच मा.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सर, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुंजाळ सर व श्री. शेळके सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांचेही मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


नेवासा पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि संघभावनेने कार्य करत हे यश मिळवले आहे. त्याचप्रमाणे, ग्रामस्तरावर कार्यरत सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून या कामगिरीत मोलाचा वाटा उचलला आहे.


-गटविकास अधिकारी श्री. संजय लखवाल यांनी सांगितले की, “ही उपलब्धी केवळ प्रशासकीय यंत्रणेची नसून, प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून पंचायत समिती स्तरावरील कार्यक्षमता वाढवून नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा आमचा उद्देश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत