देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री साई मंदिराच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त उद्या रविवार ११ मे २०२५ रोजी व...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री साई मंदिराच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त उद्या रविवार ११ मे २०२५ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देवळाली प्रवरात सन २०२३ रोजी साई मंदिर उभारण्यात आले. या मंदिराचा उद्या रविवारी द्वितीय वर्धापनदिन असून यानिमित्ताने सकाळी ६.१५ वा. काकड आरती, मंगलस्नान व नित्यनियम पूजा, दुपारी १२ वा.मध्यान्ह आरती व त्यानंतर देवळाली प्रवरा शहरातील महिला साई भक्तांकडून साईबाबांकरिता चांदीचा मुकुट महंत उद्धव महाराज मंडलिक व शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे त्यानंतर सायंकाळी ७ वा. धुपारती व त्यानंतर विनोदाचार्य विश्वनाथ महाराज वाडेकर(जळगाव, खान्देश) यांचे जाहीर हरिकीर्तन व तदनंतर साई भक्त महिला मंडळ, देवळाली प्रवरा यांच्यावतीने महाप्रसाद पंगत दिली जाणार आहे.
तरी या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीयांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत