राहुरी/वेबटीम:- येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. आज सकाळी उमेदवार प्रतिनिधी व पत्रक...
राहुरी/वेबटीम:-
येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. आज सकाळी उमेदवार प्रतिनिधी व पत्रकार बांधवांना मतदान प्रक्रियाचे वार्तांकण करण्यासाठी दिले जाणाऱ्या ओळखपत्रावरील चक्क मतदान मोजणीची तारीख चुकल्याने निवडणूक प्रशासनाचा सावळा गोंधळ उजेडात आला आहे.
राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय व छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आज (दि.३१) डॉ. तनपुरे कारखाना निवडणूकीची मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू होते.
आज होत असलेल्या डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीमध्ये चक्क उमेदवार प्रतिनिधी, मतदान/मतमोजणी प्रतिनिधी तसेच पत्रकार बांधवांना मतमोजणीची तारीख गेल्या दोन वर्षांपूर्वीची दिल्याने मतमोजणीस कधी जायचे? असा प्रश्न उपस्थित केला जात असून उमेदवार प्रतिनिधींसह पत्रकार बांधव संभ्रमावस्थेत पडले आहे. या वर चक्क
ओळखपत्रावर ०१/०६/२०२३ ला मतमोजणी असल्याचे नमूद करण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत