राहुरी फॅक्टरीतील बैलगाडी यार्ड येथे उद्या सोमवारी किर्तन व महाप्रसाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील बैलगाडी यार्ड येथे उद्या सोमवारी किर्तन व महाप्रसाद

राहुरी फॅक्टरी (वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर,शनैश्वर देवस्थान,बैलगाडी यार्ड येथे उद्या सोमवार दिनांक २६ मे रोजी दुपारी १२....

राहुरी फॅक्टरी (वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर,शनैश्वर देवस्थान,बैलगाडी यार्ड येथे उद्या सोमवार दिनांक २६ मे रोजी दुपारी १२.३० वाजता शनैश्वर जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी १२.३० वा अभिषेक तसेच सायंकाळी ६ वाजता श्री.संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट,ताहराबादचे मठाधिपती महंत.ह.भ.प.अर्जुन महाराज तनपुरे यांचे सुश्राव्य जाहीर हरीकीर्तन पार पडणार आहे. यावेळी कै. एकनाथ येवले यांच्या स्मरणार्थ  अविनाश हरिभाऊ येवले यांच्यावतीने  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जुने हनुमान मंदिर,शनैश्वर देवस्थान ट्रस्ट,राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत