नवनियुक्त एसपी सोमनाथ घार्गे यांची राहुरी पोलीस ठाण्यास भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नवनियुक्त एसपी सोमनाथ घार्गे यांची राहुरी पोलीस ठाण्यास भेट

राहुरी(वेबटीम) अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज रविवारी सकाळी राहुरी पोलीस ठाण्यास भेट दिली. गेल्या दोन दिवसा...

राहुरी(वेबटीम)



अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज रविवारी सकाळी राहुरी पोलीस ठाण्यास भेट दिली.



गेल्या दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. ते काल अकोले-संगमनेर तालुका दौऱ्यावर होते.


आज सकाळी त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यास भेट दिली असता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी त्यांचे स्वागत केले.


जिल्हा पोलीस अधिक्षक घार्गे यांनी कामकाजाची माहिती घेतली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत