राहुरी फॅक्टरीतील साई आदर्श हॉलमध्ये उद्या शनिवारी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील साई आदर्श हॉलमध्ये उद्या शनिवारी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या शनिवार २१जुन २०२५ रोजी पहाटे ५ ते ६.३० य...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या शनिवार २१जुन २०२५ रोजी पहाटे ५ ते ६.३० या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती योगप्रशिक्षक श्री किशोर पा.थोरात यांनी दिली आहे.

गेल्या आठ वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्हा पतंजली योग समिती व साई आदर्श मल्टिस्टेट  यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग शिबीर पार पडल्यानंतर अखंडपणे हा स्थायी योग वर्ग चालू आहे. दररोज नियमितपणे पहाटे ५ ते ६.३० यावेळेत योगसाधना साई आदर्श हॉलमध्ये चालू असते. दरवर्षी २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस या स्थायी योग वर्गाकडून साजरा केला जातो. एक निरोगी जिवनशैली आत्मसात करण्यासाठी योगसाधनेशिवाय पर्याय नाही आणि हिच योगसाधना शिकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने  साई आदर्श हॉलमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन योग वर्गाकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत