राहुरी(वेबटीम) राहुरी शहरातील साई फ्रुट अर्बन को.ऑफ.क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी इस्माईल गुलाब सय्यद यांची तर व्हा. चेअरमनपदी भागचंद पुंज...
राहुरी(वेबटीम)
राहुरी शहरातील साई फ्रुट अर्बन को.ऑफ.क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी इस्माईल गुलाब सय्यद यांची तर व्हा. चेअरमनपदी भागचंद पुंजा नारद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
साई फ्रुट अर्बन को.ऑफ.क्रेडिट सोसायटीच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब रासकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ निवड प्रकिया पार पडली
याावेळी रमेश गोडसे, अनिल डोळस,मुनिर शेख, अब्बास सय्यद, राजू साळवे,वसीम सय्यद,रेहाना सय्यद, द्वारका नारद, संतोष मोरे यांची संचालकपदी तर स्वीकृत संचालक म्हणून सरदार सय्यद यांची निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत