देवळाली प्रवरा(वेबटीम ) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अराध्यदैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याचे रवि...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अराध्यदैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याचे रविवार २२ जून २०२५ रोजी प्रस्थान होणार आहे
समस्त शहरवासीयांच्या प्रेरणेने व भक्तपरिवार यांच्या सहकार्याने नामदेव महाराज शास्री यांच्या अधिपत्याखाली आणि बाबामहाराज मोरे, सुभाष महाराज विधाटे, भगवान महाराज मोरे ( देहूकर ) सोमनाथ महाराज माने, किशोर महाराज निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे सकाळी १० वाजता माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व प्रिती कदम यांचे हस्ते पालखी पूजन होऊन त्यानंतर दिंडी पंढरीकडे प्रस्थान होणार आहे.
सोमवारी २३ जून रोजी सकाळी ८ वाजता माजी खासदार लोकनेते बापूसाहेब तनपुरे व डॉ. सौ.उषाताई तनपूरे यांच्या हस्ते राहुरी शहरात पालखी पूजन होऊन दिंडी मार्गस्थ होणार आहे.
दिंडी सोहळ्या दरम्यान सकाळी ५ ते ६ काकडा व भजन,सकाळी ७ वाजता आरती व पुढील प्रवासात अखंड भजन सेवा सुरु,सकाळी ११ ते १२ प्रवचन व नंतर भोजन विश्रांती व प्रवास,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, आरती, रात्री ७ ते ८ किर्तन व नंतर भोजन अशा प्रकारे दैनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपूर येथे दिंडीचे वास्तव्य श्री त्र्यंबकराज स्वामी वारकरी सेवाश्रम ( भटुंबरे ) पंढरपूर येथे असणार आहे. शनिवार दि.५ जूलै रोजी सायंकाळी ५ वाजता पंढरपूर येथे दिंडी प्रदक्षिणा होईल व ७ जूलै रोजी सकाळी महाप्रसादाचे वाटप होऊन दिंडीचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. दिंडी सोहळ्याची सांगता देवळाली प्रवरा येथिल सहारा लॉन्स,नियोजित श्री त्र्यंबकराज स्वामी वारकरी शिक्षण संस्था तथा धर्म संस्कार केंद्रा शेजारी,श्रीरामपूर रस्ता, देवळाली प्रवरा येथे शुक्रवार दि.११ जूलै रोजी सकाळी १० ते १२ वाजता ह.भ.प.महंत उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तन होऊन महाप्रसादाने होणार आहे. यावेळी संतपूजन श्री व सौ.शिलाताई सोन्याबापू जाधव या उभयतांच्या हस्ते होणार आहे.
दिंडी यशस्वीतेसाठी संस्थापक ह.भ.प. सिताराम ढुस यांच्या मार्गदर्शनाखाली श्री त्र्यंबकराज स्वामी शिक्षण व वारकरी संस्था देवळाली प्रवरा ,व्यवस्थापन समिती प्रयत्नशील आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत