राहुरी फॅक्टरीतील संकल्प नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुजाता कदम तर भालचंद्र थोरात व्हा.चेअरमन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील संकल्प नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुजाता कदम तर भालचंद्र थोरात व्हा.चेअरमन

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी माजी नगरसेविका सौ.सुजाता सुधाकर कदम तर व्हाईस चेअरमनप...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी माजी नगरसेविका सौ.सुजाता सुधाकर कदम तर व्हाईस चेअरमनपदी भालचंद्र थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


संकल्प नागरी पतसंस्थेसाठी  सन २०२५ ते २०३० या  कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया बिनविरोध  पार पडली. काल मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए.शेख  यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.

चेअरमन पदासाठी  सुजाता सुधाकर कदम  यांच्या नावाची सूचना अण्णासाहेब चोथे  यांनी मांडली तर डॉ. शौकत सय्यद  यांनी अनुमोदन दिले.  व्हा. चेअरमनपदा भालचंद्र थोरात यांच्या नावाची पारसमल खिवंसरा यांनी मांडली तर विजयकुमार खळेकर यांनी अनुमोदन दिले.

याावेळी प्रा.सुधाकर कदम ,अण्णासाहेब चोथे , डॉ. शौकत सय्यद , विठ्ठल शेटे , विजयकुमार खळेकर,  बबन डोंगरे, संदीप माने, पारसमल खिवंसरा ,स्मिता वेदपाठक यांची संचालक पदी निवड करण्यात आली.

यावेळी आदर्श नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब वाळुंज, अमोल पवार, विक्रांत धुमाळ ,मुकुंद वेदपाठक राजवर्धन कदम , कृष्णा कदम  व संकल्प पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत