देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बँक ऑफ बडोदा शेजारी डॉ.विद्या गायकवाड(जनरल फिजिशियन) यांचे श्री स्वामी क्लिनि...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बँक ऑफ बडोदा शेजारी डॉ.विद्या गायकवाड(जनरल फिजिशियन) यांचे श्री स्वामी क्लिनिक सुरू झाले असून २४ रुग्णसेवा देण्यावर भर दिला जाणार असल्याचे डॉ.विद्या गायकवाड यांनी सांगितले.
देवळाली प्रवरात महिला डॉक्टरांची ओपीडी नसल्याने महिला रुग्णांची होणारी कुचंबना लक्षात घेऊन डॉ.विद्या गायकवाड यांनी श्री स्वामी क्लिनिक सुरू केले आहे. २४ तास रुग्णसेवा रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहे.
जनरल फिजिशियन, स्त्रीरोग विकार, बालरोग विकार, पोट दुःखी, डोकेदुखी, कान , नाक, घसा विकार, बीपी, शुगर तपासणी, नेबुलायझेशन , डे केअर सेंटर आदी सेवा दिल्या जाणार असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
या ठिकाणी कान, नाक, घसा तज्ञ व जनरल फिजिशियन डॉ.अनिरुद्ध ठोंबरे हे ही गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवा देत आहे. त्यांची ओपोडी सकाळी ८ ते १० व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत असणार आहे. तर डॉ.विद्या गायकवाड यांची ओपीडी पूर्णवेळ रूग्णांसाठी सुरू राहणार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत