राहुरी(वेबटीम) तालुक्यातील धानोरे येथील रहिवासी व संत महिपती विद्यालय तांभेरेचे ज्येष्ठ शिक्षक व प्रेरणा पतसंस्थेचे संचालक नंदकुमार दिघे य...
राहुरी(वेबटीम)
तालुक्यातील धानोरे येथील रहिवासी व संत महिपती विद्यालय तांभेरेचे ज्येष्ठ शिक्षक व प्रेरणा पतसंस्थेचे संचालक नंदकुमार दिघे यांची कन्या श्रुतिका नंदकुमार दिघे हिने नीट परीक्षेत ५७३ गुण मिळवून ऑल इंडिया रँक मध्ये ओबीसी मध्ये १८५६ वी रँक प्राप्त केली आहे.
श्रुतिका नंदकुमार दिघे हिने निट परीक्षेमध्ये ९९.७७ गुण व ऑल इंडिया रँक ४८१० ओबीसी मधून १७५६ रँक मिळाली आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिघे वस्ती धानोरे येथे झाले तर माध्यमिक शिक्षण रयत लोणी, बारावी राजश्री शाहू कॉलेज, लातूर येथे झाले आहेत. इयत्ता दहावी मध्ये तिने ९८.३० व बारावी सायन्स मध्ये ८८. ३० टक्के गुण मिळाले आहेत. तिला जेईई परीक्षेत फिजिक्स विषयात शंभर पैकी शंभर मार्क मिळाले आहेत.व इयत्ता आठवी स्कॉलरशिप मध्ये राज्यात आठवा क्रमांक तीन मिळाला होता. रयत शिक्षण संस्थेची उत्तर विभाग आदर्श विद्यार्थिनी सुद्धा होती. तिचे प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत