पानेगावात आमदार विठ्ठलराव लंघे यांची जंगले कुटुंबाच्यावतीने नवसपूर्ती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पानेगावात आमदार विठ्ठलराव लंघे यांची जंगले कुटुंबाच्यावतीने नवसपूर्ती

पानेगांव (वार्ताहर)  पानेगांव येथे जंगले कुटुंबाच्या वतीने नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांची पानेगांव मांजरी येथील अस...

पानेगांव (वार्ताहर) 



पानेगांव येथे जंगले कुटुंबाच्या वतीने नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांची पानेगांव मांजरी येथील असलेले ग्रामदैवत चंद्रागिरी महाराजांच्या दरबारात शेरनी तुला अर्जुन पाराजी जंगले व सौ उषा अर्जुन जंगले यांचा कुटुंबाच्या वतीने करण्यात आला. आमदार विठ्ठलराव लंघे यांचे पानेगांव येथे आगमन होताचं फटाक्यांच्या आताषबाजीने स्वागत करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला श्रीफळ वाढवून गावातील कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.



ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाधिकारी यांनी हि सन्मान केला यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ निकीता भोसले /आंबेकर डॉ. जयवंतराव गुडधे,मार्केट कमीटीचे माजी संचालक जालिंदर जंगले, दत्तात्रय पोटे, शिरेगांवचे माजी सरपंच किरण जाधव, लक्ष्मण माकोणे,सागर आंबेकर,रमेश गणगे, पाराजी गुडधे,सतिश जंगले, जालिंदर जंगले,विजय जंगले, रविंद्र सोनवणे सुरेंद्र जंगले शेतकरी संघटनेचे अशोक काळे, अच्युत जंगले, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे,बबनराव जंगले आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



 पानेगांव मांजरी येथील ग्रामदैवत चंद्रागिरी महाराजांच्या दरबारात मी आमदार झाल्याने जंगले कुटुंबाच्या वतीने शेरनी तुला केली निकटवर्तीय पाहुणे तसेच आमची भाची भाचे जावई तसेच दोन्ही गावच्या ग्रामस्थांचे आभार व्यक्त करत असून मुळाथडी परीसरातील प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिल- आमदार विठ्ठलराव लंघे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत