सात्रळ(वेबटीम) सात्रळ पंचक्रोशीच्या ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, दीन दलितांच्या मुला-मुलींची उच्च शिक्षणाची सोय व्हावी, या हेतूने...
सात्रळ(वेबटीम)
सात्रळ पंचक्रोशीच्या ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, दीन दलितांच्या मुला-मुलींची उच्च शिक्षणाची सोय व्हावी, या हेतूने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. खेड्यातील मुले विशेषत: मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून 'ज्ञानगंगा घरोघरी' पोहोचल्याचे मतप्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी लावलेल्या या शैक्षणिक रोपट्याची एक शाखा लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सन १९९८ सात्रळ-सोनगाव येथे रुजवली व वाढविली. संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सात्रळ वरिष्ठ महाविद्यालयात सोनगाव-सात्रळ, धानोरे, पाथरे, हनुमंतगाव, झरेकाठी, चणेगाव, तुळापूर, निंभोरे, म्हैसगाव, वरशिंदे, कनगर, कानडगाव, वडनेर, तांभेरे, गुहा पाट परिसर, तांदुळनेर, रामपूर या गावातून तसेच वाड्या वस्तीवरून उच्च शिक्षण घेण्यासाठी मुले-मुली येतात. महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत. राष्ट्रीय स्तराच्या समितीने तिसऱ्यांदा महाविद्यालयाचे नॅक पुनर्मूल्यांकन केले असून महाविद्यालयास 'अ' श्रेणी प्राप्त झालेली आहे. सातत्याने गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचाल केल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 'उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार' प्राप्त झालेला आहे. कॅम्पस प्लेसमेंट मध्ये मागील पाच वर्षात २९० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळालेली आहे. महाविद्यालयाचे विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय संस्थांबरोबर सामंजस्य करार झालेले असून प्राध्यापकांना भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून पेटंट मंजूर झालेले आहेत. मुलांची शैक्षणिक यशोगाथा सात्रळ महाविद्यालयात नक्कीच घडते, यावर पालकांचा ठाम विश्वास आहे.
माळेवाडी-डुकरेवाडी रोड लगत साडेबारा एकराच्या पर्यावरण पूरक 'हरित व स्वच्छ महाविद्यालय परिसरात' कला, वाणिज्य व विज्ञान या युजी आणि एम. कॉम., एम. एस्सी. व पीएच. डी. रसायनशास्त्र संशोधन केंद्र या पीजी ज्ञानशाखांचेही अध्यापन केले जाते. या महाविद्यालयात नऊ कौशल्याधिष्ठीत कोर्स शिकवले जातात. तसेच मोफत पोलीस/सैनिकी भरती पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र शासन-करिअर कट्टा उपक्रम, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, रोजगार क्षमता आणि कौशल्य विकास उद्योग पूरक प्रशिक्षण, आपलं सरकार महा-ई- सेतू कार्यालय सुविधा, ट्रेनिंग प्लेसमेंट सेंटर आणि नोकरी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे.
महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ, कमवा व शिका योजना, राष्ट्रीय सेवा योजना, भौतिक सुविधांनी परिपूर्ण असलेली भव्य इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, बहुउद्देशीय हॉल, स्वतंत्र वाचन कक्ष व अभ्यासिका, कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव, रनिंग ट्रॅक, अत्याधुनिक जिम, ओपन जिम, प्रशस्त क्रीडा मैदान व मैदानी क्रीडा स्पर्धा, श्रमसंस्कार शिबिर, शैक्षणिक अभ्यास सहल, व्याख्यानमाला इत्यादी वैचारिक आणि सामाजिक उपक्रम महाविद्यालयात वर्षभर आयोजित केले जातात. उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सात्रळ पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक जडणघडण योग्य रीतीने व्हावी, यासाठी 'प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या' सात्रळ वरिष्ठ महाविद्यालयात नक्कीच प्रवेश घ्यायला हवा.
उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखलेल्या सात्रळ महाविद्यालयात ४७ उच्चविद्याविभूषित राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त अनुभवी प्राध्यापक अध्यापनाचे कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सेवेकरिता कार्यालयीन सेवक वृंद कार्यतत्पर आहे. महाविद्यालयास संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा मा. सौ. शालिनीताई विखे पाटील, मा. खासदार सुजय विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, पालक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत