अहिल्यानगरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी दादासाहेब गिते - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहिल्यानगरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी दादासाहेब गिते

अहिल्यानगर(वेबटीम) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे दादासाहेब गिते येथील विभाग प्रमुख दादासाहेब गिते यांची अहिल...

अहिल्यानगर(वेबटीम)



डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे दादासाहेब गिते येथील विभाग प्रमुख दादासाहेब गिते यांची अहिल्यानगरला निवासी उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली आहे.

दादासाहेब गिते यांचे मूळ गाव मोहरी (ता. जामखेड) आहे. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची पदोन्नती महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलसचिव पदावर बदली झाली होती. त्यानंतर भूसंपादन १४ चे उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांच्याकडे निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला होता. आता दादासाहेब गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दादासाहेब गीते यांनी यापूर्वी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच शेवगाव व नेवासा तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून आपल्या कार्याचा चांगला ठसा उमटविला होता. दादासाहेब गीते नेवासा येथे तहसीलदार म्हणून काम करत असताना वाळू तस्करांनी त्यांच्यावर गोळीबार करून मारहाण करत त्यांची गाडी पेटवून देण्याचाही प्रयत्न केला होता.

यावेळी ३२ वाळू माफियांवर अहमदनगरमध्ये मोक्का लावण्यात आला होता. वाळू माफियांना मोक्का लावण्याची राज्यातली ही पहिलीच वेळ होती.

दादासाहेब गीते हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे दादासाहेब गिते येथील विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना उत्कृष्ट काम करून जनमानसात नावलौकिक मिळविला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत