राहुरी फॅक्टरीत श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती व पसायदान प्रतिष्ठाच्यावतीने डॉ.तनपुरे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती व पसायदान प्रतिष्ठाच्यावतीने डॉ.तनपुरे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय बाबुरावदादा तनपुरे यांची पुण्यतिथी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजा...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)


राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय बाबुरावदादा तनपुरे यांची पुण्यतिथी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या  स्मारका समोर श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती आणि पसायदान प्रतिष्ठान  संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांच्या अधिपत्याखाली साजरी करण्यात आली.

 याप्रसंगी चारुदत्त पवार, सुखदेव मुसमाडे ,भास्करराव कोळसे, आबासाहेब वाळुंज, राजेंद्र साळवे, शिवाजी घाडगे, तैनुर पठाण, राधाकिसन पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी डॉ. अनिकेत तनपुरे, पत्रकार श्रीकांत जाधव, ऋषि राऊत, सागर भालेराव, भाऊ गुंजाळ, शामराव खडके, शरद देसाई, अनिस पठाण, प्रताप धावडे ,निवृत्ती जोशी ,अहिलाजी गोरे ,मछिंद्र सूर्यवंशी ,ऋषिकेश पवार ,समीर शेख भगवान डोंगरे ,इस्माईल शेख, चांगदेव पवळे, अनील शेलार ,उद्धव राऊत,अरमान सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेंद्र लांडगे म्हणाले की, राहुरी तालुक्यासाठी स्व. डॉ.बाबुराब दादा तनपुरे यांचे मोठे योगदान आहे. कारखाना कार्यस्थळावर डॉ. बाबूरावदादा तनपुरे यांचे स्मारक होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि कारखाना नवनिर्वाचित श्री.अरुण तनपूरे साहेबांसह संचालक मंडळ पुढाकार घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत