श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ नामांतर करा - शिंदे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ नामांतर करा - शिंदे

नेवासा (विशेष प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने भटक्या विमुक्त जाती-जमातीतील नाथपंथी समाजासाठी 'वसंतराव नाईक भटक्या विमुक्...

नेवासा (विशेष प्रतिनिधी)



विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने भटक्या विमुक्त जाती-जमातीतील नाथपंथी समाजासाठी 'वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आर्थिक विकास महामंडळ' अंतर्गत उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला' श्री शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ' असे नामांतर करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब शिंदे यांनी   समाजाचे  प्रांताध्यक्ष, व सेवानिवृत्त पोलीस उप-अधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.

अखिल नाथपंथी डवरी गोसावी, नाथजोगी, नाथबाबा, गोंधळी, बहरूपी, भारूडी या भिक्षुक, भटक्या जाती-जमातीच्या राज्यभरातील समाजबांधवांनी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन महामंडळाचे नामांतर करण्याचा

ठराव मंजूर केला. मच्छिंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला निवृत्त महसूल उपायुक्त आनंदराव जगताप, महादेव शिंदे, डॉ. जयाजी नाथ साहेब, नारायण शिंदे, भालचंद्र सावंत, अंबरनाथ इंगोले, डॉ. सुभाष भोसले, सुमित लगस, मोहन शिंदे, बाबा शिंदे, संजय सावंत, संजय जगताप, अशोक शिंदे, अविनाश शिंदे, दयानंद सावंत, गणेश लगस, अनिल चव्हाण, सहदेव सावंत, ऍड. नवनाथ शिंदे यांच्यासह मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग या राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने नाथपंथी समाजबांधव उपस्थित होते.

मच्छिंद्र चव्हाण म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ घोषित केले. याचे स्वागत आम्ही करतो.


पुणे येथे नुकतेच अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ या बैठकीत उपस्थित राहुन भटक्या विमुक्त विकास महामंडळ वसंतराव नाईक  उपकंपनी  श्री शिव गोरक्षनाथ नाथ पंथी समाज आर्थिक महामंडळ नामांतर करा - बाबासाहेब शिंदे 

जिल्हाप्रमुख, अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत