पत्रकार सोमनाथ वाघ यांना गरुड फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पत्रकार सोमनाथ वाघ यांना गरुड फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील मानोरी येथील पत्रकार सोमनाथ वाघ यांची गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस...

राहुरी(वेबटीम)




राहुरी तालुक्यातील मानोरी येथील पत्रकार सोमनाथ वाघ यांची गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

गरुड फाउंडेशनचे कार्याध्यक्ष रमेश खेमनर यांनी सोमनाथ वाघ यांना निवडीचे पत्र देऊन ही माहिती कळविली. हा पुरस्कार सोहळा शनिवार, (दि. ७) जून रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ नामवंत लेखक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.

  सोमनाथ वाघ हे तीन वर्षापासून मानोरी येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राहुरी तालुका सचिव म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते ग्रामीण भागातील प्रश्न निर्भिडपणे मांडत असून, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत. विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल मानोरी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत