देवळाली प्रवरा(वेबटीम) जागतिक सायकल दिनानिमित्त देवळाली प्रवरा सायकलिंग अँड ट्रेकर्स ग्रुप व श्रीरामपूर सायकलिंग क्लबच्या वतीने श्रीरामपूर ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
जागतिक सायकल दिनानिमित्त देवळाली प्रवरा सायकलिंग अँड ट्रेकर्स ग्रुप व श्रीरामपूर सायकलिंग क्लबच्या वतीने श्रीरामपूर ते देवळाली प्रवरा व रिटर्न देवळाली प्रवरा ते श्रीरामपूर असे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्याला पूरक, स्वस्त आणि पर्यावरणासाठी अनुकूल असा पर्याय म्हणजे सायकल. सायकल आनंदासाठी आरोग्यासाठी,
कधीकाळी सायकल हे रोजचं दळणवळणाचे साधन होते. नंतर स्वयंचलित दुचाकीची संख्या वाढली. आणि सायकल मागे पडली. पण आता सायकलचं पुनरुज्जीवन होत आहे असं वाटतंय. व्यायामासाठी आणि हौसेखातरही सायकल चालवणाऱ्यांचं प्रमाण वाढते. आणि त्या निमित्ताने लोक नव्याने सायकलच्या प्रेमात पडताहात.
सायकल दिवस कसा सुरू झाला?
अमेरिकेतील प्रा. लेझेक सिबिलस्की यांना जागतिक सायकल दिनाचे जनक मानले जाते. २०० वर्षांहून अधिक काळ सायकलचा पर्यावरणस्नेही आणि वाहतुकीचे स्वस्त साधन म्हणून असणारा फायदा लेझेक यांच्या ध्यानी आला होता. सायकलचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि संयुक्त राष्ट्रमहासभेने एप्रिल २०१८ मध्ये ३ जून हा जागतिक सायकल दिवस म्हणून घोषित केला.
जागतिक सायकल दिनानिमित्त देवळाली प्रवरा आणि श्रीरामपूर सायकलिंग क्लब च्या वतीने श्रीरामपूर ते देवळाली प्रवरा अशी सायकल रॅली काढून देवळाली प्रवरा शहरामधून सायकल रॅली काढण्यात आली.
या सायकल रॅलीमध्ये देवळाली प्रवरा नगर परिषदेचे ग्रंथपाल संभाजी वाळके, राहुल दुधाडे , प्रवीण डावखर सेवानिवृत्त बांधकाम अभियंता सुरेश मोटे, सुदाम कडू, अशोक जाधव तसेच श्रीरामपूर सायकलिंग क्लबचे डॉ. संकेत मुंदडा, डॉ. भिटे,डॉ.बडदे व इतर 40 सदस्यांनी सहभाग घेतला. तसेच या रॅलीमध्ये महिलांचाही सहभाग दिसून आला.
तसेच दिनांक 22 जून 2025 रोजी पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातून सर्व सायकलिंग क्लबचे सदस्य पंढरपूर या ठिकाणी सायकल वारी, सायकल चालवत येणार असून सायकलचा रिंगण सोहळा होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत