कणगरचे कामगार तलाठी अंकुश सोनार यांचा निरोप समारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगरचे कामगार तलाठी अंकुश सोनार यांचा निरोप समारंभ

  राहुरी प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील कनगर येथील कामगार तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी अंकुश सोनार यांनी गेली ६ वर्षे कनगर बुद्रुक व कनगर खुर...

 राहुरी प्रतिनिधी



राहुरी तालुक्यातील कनगर येथील कामगार तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी अंकुश सोनार यांनी गेली ६ वर्षे कनगर बुद्रुक व कनगर खुर्द येथे सर्वसामान्य नागरिकांना केंद्र स्थानी मानून इमाने इतबारे सेवा केली म्हणून कनगर ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव घाडगे हे होते.यावेळी ग्राम महसूल अधिकारी अंकुश सोनार व कनगर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी संभाजीराजे निमसे यांच्या वाढदिवसा निमित्त सन्मान करण्यात आला. तसेच ग्राम महसूल अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या श्रीमती कांचनताई धाडगे यांचेही ग्रामस्थांचे वतीने स्वागत करण्यात आले. प्रसंगी बोलताना सरपंच सर्जेराव घाडगे यांनी सोनार यांच्या कार्याचा गौरव करून सरकारी नोकरीत काम करत असताना सोनार भाऊसाहेब यांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्र स्थानी ठेऊन गेली ६ वर्षे काम केले. रोजची उपस्थिती व सर्वसामान्य शेतकऱ्यांचा रोज तलाठी कार्यालयाशी संबंध येत असतो उतारे देणे, नोंदी करणे यासाठी कोणत्याही प्रकारे जास्तीचे पैसे न मागणे हा सोनार भाऊसाहेबांचा महत्त्वाचा गुण असून ऑफिस मध्ये आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे काम लगेच करून देणे असे काम गावपातळीवर काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने केल्यास प्रशासनात सुशासन आल्याशिवाय राहणार नाही.

          यावेळी बाबूराव घाडगे जिल्हा परिषद सदस्य भास्करराव गाढे, उपसरपंच बाळासाहेब गाढे, ग्रामपंचायत सदस्य संदीप घाडगे, महमदभाई शेख, राजू दिवे, भाऊसाहेब आडभाई, भाऊसाहेब घाडगे, भाऊसाहेब खाटेकर, खंडू गाढे, सुनील शेटे, जितेंद्र वरघुडे, भारत खाटेकर, केशव गोरे, बाळासाहेब मुसमाडे, भाऊसाहेब दिवे, अजीज भाई शेख, लखन गाढे, शंकर जाधव, नंदू पावसे, संजय उ-हे, घामाजी दिवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार राजेद्र दिवे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत