शनिशिंगणापूर(वेबटीम) आंतरराष्ट्रीय देवस्थान श्री.क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान येथे११८ मुस्लिम कर्मचायांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबत...
शनिशिंगणापूर(वेबटीम)
आंतरराष्ट्रीय देवस्थान श्री.क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान येथे११८ मुस्लिम कर्मचायांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबत देवस्थाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पालघर येथील जयेश शहा यांनी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हंटले की, मी एक श्रद्धावान हिंदू भक्त असून शनैश्वर देवस्थानावर माझी अत्यंत निष्ठा आहे. अलीकडे माध्यमांद्वारे हे समजले की ट्रस्टमार्फत देवस्थानात एकूण ११८ मुस्लिम कर्मचायांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
हे अत्यंत धक्कादायक असून, पारंपरिक हिंदू मंदिर व्यवस्थापनात अशा प्रकारे इतर धर्मीय व्यक्तींची संख्याबळाने नेमणूक होणे हे श्रद्धाळूमध्ये अस्वस्थता आणि प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. हिंदू धर्माच्या परंपरांनुसार मंदिर प्रशासन व पूजाअर्चा कार्यात धर्माचे पालन आवश्यक असते. त्यामुळे या निर्णयाबाबत ट्रस्टने स्पष्टीकरण द्यावे, आणि तत्काळ ही नेमणूक रद्द करण्यात यावी.
जर योग्य ती कारवाई न झाल्यास, अनेक श्रद्धाळूप्रमाणेच मी देखील मंदिराला भेट देणे टाळण्याचा विचार करीत आहे.आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करावी अशी मागणी जयेश शहा यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत