राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रसिद्ध साहित्यिक व लेखिका मनीषा बाळासाहेब-रंजना लांबे यांना गरुड फाउंडेशनच्यावतीने राज्यस्त...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रसिद्ध साहित्यिक व लेखिका मनीषा बाळासाहेब-रंजना लांबे यांना गरुड फाउंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
राहुरी कृषि विद्यापीठातील अण्णासाहेब शिंदे सभागृहात गरुड फाउंडेशनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रसंगी माजीमंत्री प्राजक्त तनपुरे, राहुरीचे भूमिपुत्र तथा गडचिरोली येथील सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप भांड होते . तर यावेळी खा. निलेश लंके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर , युवा ग्रामीण पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले, शेखर चोरघे , सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे आदी उपस्थित होते.
यावेळी मनीषा लांबे साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन गौरविण्यात आले.
गरुड फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष रमेश खेमनर, रामदास बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर, रामचंद्र थोरात, रंगनाथ तमनर, पत्रकार अशोक मंडलिक, आर. आर. जाधव, जावेद शेख,सोमनाथ वाघ यांनी कार्यक्रम यशस्वीतेआठी अथक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत