डिग्रसच्या 'त्या' गोळीबार प्रकरणातील आरोपी जिल्हा रुग्णालयातून फरार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डिग्रसच्या 'त्या' गोळीबार प्रकरणातील आरोपी जिल्हा रुग्णालयातून फरार

अहिल्यानगर(वेबटीम) राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशास...

अहिल्यानगर(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली. ही घटना मंगळवारी (ता.१०) रोजी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

राहुरी तालुक्यातील डिग्रस परिसरात ७ ऑक्टोबर २०२१ रोजी दहशत करून गोळीबार केला होता. या प्रकरणी आरोपी सुनील लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज लोखंडे पोलिसांना चकवा देत फरार झाला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

काय होता डिग्रसचा प्रकार

खंडणी बहाद्दर पोलिस सेवेतून बडतर्फ झालेला पुणे येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल लोखंडे याने राहूरी तालुक्यातील डिग्रस ‌येथील ओलिस‌ ठेवले. सदर कुटूंबाचे रक्षण करताना आरोपीने पोलिस अधिकाऱ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता.

आरोपी बडतर्फ पोलिस अधिकारी सुनिल लोखंडे याने डिग्रस येथे महीलेच्या घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून पती-पत्नी आणि दोन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतांना थोडीशी चूक महागात पडली असती. मात्र  तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत