अहिल्यानगर(वेबटीम) अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून परीक्षाविधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांनी अवैध व्यवसायावर चांगलाच जरब ब...
अहिल्यानगर(वेबटीम)
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून परीक्षाविधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांनी अवैध व्यवसायावर चांगलाच जरब बसविला होता मात्र संतोष खाडे यांचा जिल्ह्यातील प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. काल जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे व इतर अधिकाऱ्यांनी निरोप देत पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पोलिस उपअधीक्षक पदाच्या प्रशिक्षणासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात धाडण्यात आले. नेवासा पोलिस ठाण्यात त्यांनी तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले, नेवाशानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकात त्यांनी एक महिना प्रशिक्षण घेतले. अहिल्यानगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वात मोठा आहे. जिल्ह्यातील राज्यकर्ते मंडळी त्याचप्रमाणे नागरिक प्रचंड जागरुक असतात. याच जिल्ह्यात काम करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अशीच तारेवरची कसरत प्रशिक्षणार्थी संतोष खाडे यांनी चार महिने केली. जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरुद्ध कारवाईचा कडक बडगा त्यांनीउगारला, त्यांनी सुगंधी तंबाखू, मावा, गुटख्याच्या ठिकठिकाणच्या कारखान्यांवर कारवाई केली. जुगार अड्यांवर छापे टाकले, दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले. बेकायदेशिर दारु विक्रेत्यांना चाप बसवला. गोवंशीय जनावरांची कत्तलखाने बंद करण्यास भाग पाडले. जिल्ह्यात सर्वदूर श्री. खाडे यांनी धडाकेबाज कारवाई केल्याने अवैध व्यावसायिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. श्री. खाडे यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी केव्हा पूर्ण होणार, असाच प्रश्न जो तो अवैध व्यावसायिक खाजगीत करत आहे.
श् खाडे यांनी आपल्या कार्यांची चुणूक दाखवून कारवाईद्वारे भल्या भल्या अवैध व्यावसायिकांना पाणी पाजल्याने सर्वसामान्य नागरिकांतून त्यांच्या कार्याचे तोंडभरुन कौतुक होत आहे. अशा कर्तबगार संतोष खाडे यांच्या चार महिन्यांचा प्रशिक्षण कालावधीचा शेवट १९ जुलै रोजी झाला. पोलिस दलातर्फे त्यांना सन्मानपूर्वक निरोप शनिवारी दि.१९ देण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,नगर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पाटील,श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती उपस्थित होते.
खाडे यांचे पुढील दोन महिन्यांचे प्रशिक्षण इतर जिल्ह्यात होईल. सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलिस उपअधीक्षक पदाची नियुक्ती दिली जाणार आहे.
*सोशल मीडियावरील खाडेंची पोस्ट*
सर्वांना नमस्कार...
अहिल्यानगर पोलीस दलात गेल्या 06 महिन्यापासून जिल्हा प्रशिक्षण संलग्नते अंतर्गत काम करत होतो.
आज अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकाळ संपून पुढील ट्रेनिंग साठी रवाना होत आहे.
या कालावधी दरम्यान जे काही काम करू शकलो त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि विशेषताः जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घार्गे सर यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि दिलेल्या जबाबदारीमुळे करू शकलो.
त्याचबरोबर काम करताना सोबतचे कर्मचारी व अधिकारी वर्ग विशेषताः नेवासा आणि विशेष पथकातील साथीदार यांच्यामुळे हे शक्य झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी केलेल्या प्रेमामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी पुढे जाऊ शकलो.
गेल्या सहा महिन्यात मी माझं कर्तव्य बजावत असताना मला माझ्या कामासाठी प्रोत्साहन देणाऱ्या असंख्य पत्रकार बंधू, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, तमाम युवकवर्ग आणि सर्वच घटकांचे मनःपूर्वक आभार मानतो..
आणि आज पुढील प्रशिक्षणासाठी रवाना होत आहे... बरच काही या जिल्ह्यातून घेऊन आणि बरच काही येथे ठेवून...
धन्यवाद भेटू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत