श्रीरामपूर(संदिप पाळंदे) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण दादा गायकवाड यांचेवर शाईफेक करून जिवघेणा हल्ला करणारा सराईत गुंड दिपक काटे व ...
श्रीरामपूर(संदिप पाळंदे)
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण दादा गायकवाड यांचेवर शाईफेक करून जिवघेणा हल्ला करणारा सराईत गुंड दिपक काटे व त्याच्या साथीदारांवर मकोका कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करावी व महाराष्ट्र सरकारने केलेला जनसुरक्षा कायदा तात्काळ मागे घ्यावा या संबंधीचे निवेदन भारतीय स्वाभिमानी संघ या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने तहसीलदार श्रीरामपूर यांच्यामार्फत महामहीम राज्यपाल यांना देण्यात आले. प्रशासनाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार राजेश पऊळ यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देण्यासाठी जिल्हा सचिव सुधाकर बागुल, युनायटेड मुस्लिम फोरमचे जिल्हाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, फ्रान्सिस शेळके, बबन शेलार, गौस तांबोळी, अंतोन भरपूरे, नंदू कदम, संजय वाहूळ, रवी बोरडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्र सरकारने आणलेला जन सुरक्षा विधेयक २०२५ हा कायदा शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि संघटनांची मुस्कटदाबी करून त्यांचा संविधानातील अनुच्छेद १४, १९ व २१ ने दिलेले भाषण स्वातंत्र्य, संघटन बनवण्याचे स्वातंत्र्य तसेच आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेण्यासाठी केलेला कायदा आहे. तरी हा कायदा संविधानातील मौलिक अधिकारांच्या विरोधात केलेला कायदा आहे. त्यामुळे हा काळा कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा. तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड हे आपल्या नियोजित कार्यक्रमानिमित्त दि. १३ जुलै २०२५ रोजी अक्कलकोट येथे गेले असता दिपक काटे नावाचा गुंड व त्याच्या सहकारी गुंडांनी प्रविण गायकवाड यांना जिवे मारण्याच्या हेतूने शाईफेक करून त्यांचेवर प्राणघातक हल्ला केला. काटे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. झालेला हल्ला हा नियोजीत कटाचा भाग असून त्या कटाच्या सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर अशी कारवाई करावी, अन्यथा संपुर्ण महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याशिवाय राहणार नाही. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास भारतीय स्वाभिमानी संघ राष्ट्रीय अध्यक्ष एच. के. रेकवाल, प्रदेशाध्यक्ष विठ्ठल दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व समविचारी सहयोगी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत