शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त   राहुरी तालुक्यातील विविध...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त   राहुरी तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.आज सोमवारी राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या सहकार्यातून पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप करण्यात येणार असून दरम्यान आज सोमवारी सकाळी राहुरी फॅक्टरी येथील श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील ९०० विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. यावेळी डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे कारखान्याचे संचालक युवा नेते हर्ष तनपूरे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे,संचालक अशोक उऱ्हे,साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन,उद्योजक किशोर पंडित,राहुरी नोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश साबरे,प्राचार्य उत्तमराव खुळे,पर्यवेक्षक तेलोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

   

यावेळी बोलताना दीपक त्रिभुवन म्हणाले की,शांती चौक मित्र मंडळाचे नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान राहिले आहे.मागच्या वर्षी श्रीरामपुर मतदार संघातील सर्व शाळांना १ लाख वह्यांचे वाटप एका महिन्यात करण्यात आले.याही वर्षी राहुरी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना वह्यांचे वाटप करण्यात येणार असून जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश सांबरे व उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पूर्णत्वास नेणार आहे.यापुढील काळात आम्ही जनतेच्या सेवेत नेहमीच उपलब्ध राहणार असल्याचे ते म्हणाले.


शाळेचे प्राचार्य उत्तमराव खुळे यांनी या उपक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानून शांती चौक मित्र मंडळ व साई आदर्श मल्टीस्टेटचे नेहमीच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य असल्याचे सांगितले.


यावेळी प्रकाश सोनी,किशोर कोबरने,सुनील विश्वासराव,सुनील संचेती,अजित येवले सर,नितीन डंबाळे,दादा जाधव,साई त्रिभुवन,प्रवीण पाळंदे आदींसह शांती चौक मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत