देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषदे प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आला. नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करणार आलेल्या ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषदे प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आला. नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करणार आलेल्या आराखड्यावर येत्या २१ ऑगस्टपर्यंत पालिका प्रशासनकडे हरकती घेणे अपेक्षित आहे. त्यानंतर अंतिम आराखडा जाहीर होईल. मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज हा प्रभाग आराखडा जाहीर करण्यात आला.
१० प्रभागातून २१ निवडून दिले जाणार आहे. त्यात ११ नगरसेविका महिला असणार आहे. त्यासाठीच्या प्रभाग आराखडा निवडणूक आयोगाच्या आलेल्या आदेशानुसार नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करण्यात आला.
असा आहे प्रभागनिहाय आराखडा
*प्रभाग क्रमांक - १*
एकूण लोकसंख्या-३२४०
*व्याप्ती* विटभट्टी परिसर, गणेश हाऊसिंग सोसायटी, भंडारी कॉलनी, नंदकुमार पवार शाळा परिसर, चव्हाण वस्ती, दत्तनगर, आंबी स्टोअर रस्ता परिसर, दिवे तारडे वस्ती, साळुंकेवस्ती, शिक्षक कॉलनी, इनामदार वस्ती, दवणगांव रोड परिसर.
उत्तर कोल्हार रस्ता ग.नं.११८६ पासून दवणगांव शिवेने आंबी शिव गट. नं. १४९९ चे ईशान्य कोप-यापर्यंत.
पुर्व- ग.नं.१४९९ च्या ईशान्य कोप-या पासून पुर्वेकडील बांधाने गट नं. १५०१ च्या ईशान्य कोप-यापर्यंत, गट नं. १५०१ च्या ईशान्य कोप-यापासून पुर्वे कडे गट नं. १५१२ आंबी रस्त्यापर्यंत गट नं.१५१२ आंबी रस्त्याने दक्षिणेकडे श्रीरामपुर फाटा
दक्षिण- गट नं.१६०० बेलापुर रस्त्याने गट नं. १६२२ श्री. समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदीरापर्यंत. दक्षिण- गट नं. १६२२ श्री. समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदीरापासून २० मीटर रस्त्याने श्रीरामपुर रोड सोसायटी चौकापर्यंत.
पश्चिम श्रीरामपुर रोड सोसायटी चौक कोल्हार रस्त्याने पश्चिमेकडे गट.नं.११८६ कानिफनाथ मंदीरापर्यंत.
*प्रभाग क्रमांक - २*
एकूण लोकसंख्या -२९९५
व्याप्ती- गवळी वसाहत, वाळुंज वस्ती, गडाख वस्ती, वाकण परिसर, डाकले फार्म परिसर.
उत्तर- ग.नं.१५०४ आंबी अमंळनेर केसापुर शिवेने गट.न.१७१० यापर्यंत. कैसापुर शिव ईशान्य कोपऱ्यापर्यंत
पूर्व- ग.नं.१७१) ईशान्य कोप-यातून करजगांव जातप शिवेने दक्षिण कडे लेखिरोड गट न. १९९१ चे आग्नेय कोपऱ्यापर्यंत
दक्षिण- गट न.१९९१ चे आग्नेय कोप-यापासून लाख रस्त्याने पश्चिमे कडे श्री. समर्थ बाबुराव पाटील वसाहत सार्वजनिक शौचालयापर्यंत. श्री. समर्थ बाबुराव पाटील | वसाहत सार्वजनिक शौचालया पासून पश्चिमेकडे न.पा कार्यालयामागील रस्त्याने गवळी वसाहत पुलापर्यंत.
पश्चिम- गवळी वसाहत पुलापासून बेलापूर रस्त्याने उत्तरेकडे गट नं १६०० चे उत्तर बांधापर्यंत गट नं १६०० चे उत्तर बांधापासून उत्तरेकडे आंबी रस्त्याने गट नं १५१२ ईशान्य कोप-यापर्यंत. गट नं १५१२ ईशान्य कोप-यापासून पश्चिमेकडे गट नं १५०३ आंबी स्टोअर रस्त्यापर्यंत. गट नं १५०३ ची नैऋत्य दिशा. आंबी स्टोअर रस्त्याने आंबी-अंमळनेर शिवेपर्यंत.
*प्रभाग क्रमांक ३*
एकूण लोकसंख्या - ३०१४
व्याप्ती-मुसमाडे वस्ती, लाख रस्ता, पंडीत वस्ती, आटक तोडमल वस्ती, कानिफनाथ मंदीर परिसर गणेशनगर कार, खुरुद सांगळे, भांड वस्ती, उंडे वाळके वस्त्ती
उत्तर- लाख रस्ता गट नं. २२०९ चे वायव्य कोप-यापासून पुर्वेकडे लाख रस्त्याने गट नं. १९९२ चे ईशान्य कोपरा जातप शिवेपर्यंत.
पुर्व- ग.नं.१९९२ ईशान्य कोप-या पासून जातप शिवेने दक्षिणेकडे टाकळीमियों शिव चारी नं. ४ गट न.१२४ पर्यंत.
दक्षिण- गट न.१२४ पासून टाकळी मियाँ रस्ता चारी नं.४ ने पश्चिमेकडे शेटेवाडी रस्ता गट न.३१८ चे नैऋत्य बांधापर्यंत.
पश्चिम गट नं. ३१८ चे नैऋत्य कोप-यापासून शेटेवाडी रस्त्याने उत्तरेकडे गट नं.८ श्री. नाना होले यांचे घरापर्यंत. गट नं.८ च्या कोप-यापासून पुर्वेकडे गट नं.४१४ मधून गट नं.२९४ श्री. सावित्रा मिडगे यांचे घरापर्यंत. गट नं.२९४ श्री. सावित्रा मिडगे यांचे घरापासून चारी नं.३ ने उत्तरेकडे गट नं. २२०९ लाख रस्त्यापर्यंत
*प्रभाग क्रमांक ४*
एकूण लोकसंख्या-४०२८
व्याप्ती- सोसायटी परिसर, पुण्याई बंगला परिसर, बाजारतळ परिसर, खांदे गल्ली, काकासाहेब चौक, शिवाजी चौक, राममंदीर चौक, विश्वकर्मा चौक, संत गोरोबा काका चौक, आण्णाभाऊ साठे वसाहत, टाकळीमियाँ रस्ता, होले वस्ती, फत्तेराज मंदीर परिसर, राजवाडा परिसर, समर्थ बाबुराव पाटील वसाहत
उत्तर- २० मीटर रस्ता सोसायटी चौक आण्णासाहेब पाटील कदम पुतळया पासून २० मीटर रस्त्याने पुर्वेकडे श्री. बाबुराव पाटील महाराज मंदीरा पर्यंत. श्री. बाबुराव पाटील महाराज मंदीरापासून गवळी वसाहत पुलापर्यंत. गवळी वसाहत पुलापासून नगरपरिषद कार्यालयामागील रस्त्याने श्री. समर्थ बाबुराव पाटील वसाहत सार्वजनिक शौचालयापर्यंत. शौचालया पासून पुर्वेकडे गट न.१९२४ /१ चारी नं.३ पर्यंत.
पुर्व- गट न.१९२४ /१ च्या ईशान्य कोप-यापासून दक्षिणेकडे चारी नं.३ ने गट नं. २९४ सावित्रा मिडगे यांचे घरा पर्यंत,
दक्षिण- गट नं.२९४ सावित्रा मिडगे यांचे घरापासून गट नं.४१४ व १२ मधून श्री. नाना होले यांचे गट नं.८ च्या कोप-यापर्यंत, गट नं.८ च्या कोप-या पासून राजळे यांच्या गट नं.४१५ चे बांधापर्यंत. गट नं.४१५ राजळे यांच्या शेत जमीन बांधाने पश्चिमेकडील भिल्ल स्मशान भुमी पश्चिम भिंतीपर्यंत, भिल्ल स्मशानभुमी भिंती शाळे समोरील रस्त्याने पश्चिमेकडे गट नं.४२१ चे गावठाण पाण्याच्या टाकी पर्यंत. गट नं.४२१ चे उत्तर कोप-यापासून दक्षिणेकडे श्री. येवले यांचे गट नं.६२७ चे आग्नेय बांधा पर्यंत. गट नं.६२७ चे आग्नेय कोप-यापासून पश्चिमेकडे बिरोबावाडी रस्त्याने श्री. सर्जेराव टिक्कल यांचे गट नं. ६३० च्या नैऋत्य कोप-यापर्यंत.
पश्चिम - श्री. सर्जेराव टिक्कल यांचे गट नं. ६३० नैऋत्य कोप-यापासून उत्तरे कडे अमरधाम गट नं.६४८ चे ईशान्य कोप-यापर्यंत, गट नं.६४८ चे ईशान्य कोप-यापासून पश्चिमेकडे, श्रीरामपुर रस्ता गट नं. १०९३ चे आग्नेय कोपऱ्यापर्यंत गट न-१०९३ चे आग्नेय कोपऱ्यापासून श्रीरामपूर रस्त्याने उत्तरेकडे सोसायटी चौकापर्यंत
*प्रभाग क्रमांक ५*
एकूण लोकसंख्या - २९३६
व्याप्ती - शेटेवाडी, कारखाना रोड, भालेकर वस्ती, खटकळी परिसर, बिरोबावाडी परिसर, शेतकी फार्म
उत्तर - गट नं.६५० चे वायव्य कोप-या पासून पुर्वेकडे गट नं.६४८ च्या ईशान्य कोप-यापर्यंत, गट नं.६४८ च्या ईशान्य कोप-यापासून दक्षिणेकडे खटकळी वसाहत रस्त्याने गट नं.६३० च्या नैऋत्य कोप-या पर्यंत, गट नं.६३० च्या नैऋत्य कोप-या पासून बिरोबावाडी रस्त्याने पुर्वेकडे गट नं.६२७ चे आग्नेय कोप-यापर्यंत. गट नं. ६२७ चे आग्नेय कोप-यापासून उत्तरेकडे गट नं.४२१ (पाण्याची टाकी) कोप-यापर्यंत.
उत्तर- गट नं.४२१ उत्तर कोप-या पासून हायस्कूल शाळेसमोरील रस्त्याने पुर्वेकडे भिल्ल स्मशानभुमी भिंतीने पश्चिम बाजूपर्यंत. भिल्ल स्मशान भुमी भिंत दक्षिण बाजुने श्री राजळे यांच्या गट नं.४१५ शेतजमीन बांधाने शेटेवाडी रस्त्यापर्यंत.
पूर्व- श्री. राजळे यांचे गट नं.४१५ चे ईशान्य कोप-यापासून शेटेवाडी रस्त्याने दक्षिणेकडे गट नं.३१९ चा आग्नेय कोपरा चारी नं.४ पर्यंत.
दक्षिण- गट नं.३१९ चे आग्नेय कोप-या पासून चारी नं.४ ने पश्चिमेकडे गट नं. ४६८ चा नैऋत्य कोपरा कॅनाल रस्त्यापर्यंत, गट नं. ४६८ पासून पश्चिमेकडे कॅनाल रस्त्याने गट नं.४५० चे पुर्व बाजू नैऋत्य कोपरा कारखाना रस्त्यापर्यंत.
पश्चिम- गट नं.४५० चे पुर्व बाजू कारखाना रस्त्याने उत्तरेकडे गट नं.४३४ चे वायव्य कोपरा कॅनालपर्यंत, गट नं.४३४ वायव्य कोप-यापासून पश्चिमेकडे कॅनालने श्रीरामपुर रस्ता गट नं. ५९३ चे नैत्रऋत्य कोप-यापर्यंत. गट नं.५९३ उत्तरेकडे श्रीरामपुर रस्त्याने गट नं.६५० चे वायव्य कोपरा अमरधाम ओढयापर्यंत.
*प्रभाग - ६*
एकूण लोकसंख्या-२९७०
व्याप्ती - येवले देवगिरे वस्ती, ढुस वस्ती, गुहा रोड, कदम वस्ती, इरिगेशन बंगला, म्हसे कॉलनी, वृंदावन कॉलनी, वाणी वरखडे वस्ती, कर्मवीर अॅकेडमी, गणेगांव रस्ता परिसर, इनाम वस्ती
उत्तर -गट नं. ११८५ उत्तर कोप-या पासून कोल्हार रस्त्याने पुर्वेकडे सोसायटी चौक श्रीरामपुर रस्त्यापर्यंत,
पूर्व- सोसायटी चौक श्रीरामपुर रस्त्याने दक्षिणेकडे नगरमनमाड हायवे गट नं.७३५ चे आग्नेय कोपरा (विठामाधव चौकापर्यंत.)
दक्षिण- गट नं.७३५ विठामाधव चौक आग्नेय कोप-यापासून नगर मनमाड हायवेने गट नं. ८५० चे उत्तर कोप-या पर्यंत. गट नं. ८५० चे उत्तर कोप-या पासून गणेगांव रस्त्याने गट नं.८४५ कर्मवीर अॅकाडमीचे पश्चिम कोप-या पर्यंत.
पश्चिम- गट नं.८४५ कर्मवीर अॅकाडमी पासून गुहा शिवेने उत्तरेकडे गट नं.११८५ कोल्हार रस्त्यापर्यंत.
*प्रभाग क्रमांक - ७*
लोकसंख्या-२८१३
व्याप्ती- प्रसादनगर, आंबेडकर पुतळा परिसर, शिंगी प्लॉट, समर्थनगर, सरस्वती कॉलनी, डिपॉल स्कूल परिसर, साईमंदीर परिसर.
उत्तर- गणेगांव रस्ता गट नं. ८४५ कर्मवीर अॅकाडमी पासून नगर मनमाड हायवे गट नं.८५० पर्यंत, गट नं.८५० पासून नगर मनमाड हायवेने विठामाधव चौक गट नं.७३५ पर्यंत.
पुर्व- गट नं.७३५ विठामाधव चौकातून ताहराबाद रस्त्याने प्रसादनगर आंबेडकर पुतळा रस्ता श्री. प्रेमनाथ आण्णा पवार यांचे घरापर्यंत श्री. प्रेमनाथ पवार यांचे घरापासून पुर्वेकडे मालती वसंत कदम यांचे घरापर्यंत, मालती वसंत कदम यांचे घरापासून उत्तरेकडे भिमराज कृष्णाजी पवार यांचे घरापर्यंत, भिमराज पवार यांचे घरापासून पुर्वेकडे नवनाथ भाउसाहेब चिंचाणे यांचे घरापर्यंत. चिंचाणे यांचे घरापासून दक्षिणेकडे चिंचविहीरे शिव मनोहर अल्हाट यांचे घरापर्यंत.
दक्षिण- चिंचविहीरे शिव मनोहर अल्हाट यांचे घरापासून पश्चिमेकडे ताहराबाद रस्ता गट नं.७७५ पर्यंत, गट नं.७७५ पासून चिंचविहीरें शिवेने गट नं.८०८ गणेगांव ओढयापर्यंत.
पश्चिम- गट नं.८०८ गणेगांव ओढयापासून गणेगांव शिवेने गट नं.८४५ कर्मवीर अॅकडमी गणेगांव रस्त्यापर्यंत.
*प्रभाग क्रमांक ८*
एकूण लोकसंख्या-२९३६
व्याप्ती- गुरुकुल वसाहत, आदिनाथ वसाहत, श्री. विवेकानंद नर्सिंगहोम परिसर, मुंडे वस्ती, डॉ. बाबुराव दादा हाउसींग सोसायटी (मुळा कॉलनी), कराळेवाडी, दत्तनगर, कारखाना कॉलनी काही भाग.
उत्तर - गट नं. ५६६/१ चे चॉईसबाजार चे नैऋत्य कोप-यापासून रावसाहेब दादा गायकवाड, दगडू गोटीराम गायकवाड यांचे घरापासून पुर्वेकडे देविदास कासार यांचे घरापर्यंत, देविदास कासार यांच्या घरापासून पुर्वेकडे रामभाउ सखाराम येवले यांचे कराळेवाडी रस्त्यापर्यंत, कराळेवाडी रस्त्याने दक्षिणेकडे चाळ नं. एस-९ देशमुख यांचे घरापर्यंत , चाळ नं. एस-९ देशमुख घरापासून पुर्वेकडे एस-१० प्रविण प्रकाश त्रिभूवन यांचे घरापर्यंत, श्री. प्रविण त्रिभूवन यांचे घरापासून दक्षिणेकडे चाळ क्रं. एस-३० श्री. बाळासाहेब पाटील यांचे घर नगर मनमाड हायवेपर्यंत, नगरमनमाड हायवेने पुर्वेकडे गट नं. ५३० गुंजाळ नाक्यापर्यंत.
पूर्व- गुंजाळ नाका गट नं.५३०
दक्षिण- गुंजाळ नाका गट नं.५३० पासून चिंचविहीरे शिवेने पश्चिमेकडे प्रसादनगर श्री. मनोहर अल्हाट यांचे घरापर्यंत.
पश्चिम- चिंचविहीरे शिव श्री. मनोहर अल्हाट यांचे घरापासून उत्तरेकडे श्री. नवनाथ भाउसाहेब चिंचाणे यांचे घरापर्यंत, श्री. चिंचाणे यांचे घरापासून पश्चिमेकडे श्री. भिमराज कृष्णाजी पवार यांचे घरापर्यंत, श्री. भिमराज पवार यांचे घरापासून दक्षिणेकडे मालती वसंत कदम यांचे घरापर्यंत. मालती कदम यांचे घरापासून पश्चिमेकडे ताहराबाद रस्ता श्री. प्रेमनाथ पवार यांचे घरापर्यंत. श्री. प्रेमनाथ पवार यांचे घरापासून ताहराबाद रस्त्याने उत्तरेकडे विठामाधव चौक गट नं.७३५ पर्यंत.
*प्रभाग क्रमांक - ९*
एकूण लोकसंख्या- ३२२४
व्याप्ती - कारखाना कॉलनी, सोमश्वर वसाहत, आबिंकानगर, वैष्णवीचौक, स्वदेशनगर ,कारखाना परिसर.
उत्तर- श्रीरामपुर रस्ता गट नं.५९३ चे नैऋत्य कोप-यापासून कॅनालने पुर्वेकडे गट नं.४३४ चे उत्तरचे बांधापर्यंत.
पूर्व- गट नं.४३४ चे उत्तर चे बांधा पासून कारखाना रस्त्याने दक्षिणेकडे चिंचविहीरे शिव गुंजाळ नाका गट नं.५३० पर्यंत.
दक्षिण- गट नं.५३० गुंजाळ नाक्या पासून नगरमनमाड हायवेने पश्चिमेकडे कारखाना चाळ क्रं. एस-३० श्री. बाळासाहेब पाटील यांचे घरापर्यंत. श्री. बाळासाहेब पाटील यांचे घरापासून उत्तरेकडे कारखाना चाळ क्रं. एस-१० श्री. प्रविण त्रिभूवन यांचे घरापर्यंत. श्री.प्रविण त्रिभूवन यांचे घरापासुन पश्चिमेकडे कारखाना चाळ क्रं. एस-९ श्री. देशमुख ,कराळेवाडी रस्त्यापर्यंत. कराळेवाडी रस्त्याने उत्तरेकडे श्री. रामभाउ येवले यांचे घरापर्यंत. श्री. रामभाउ येवले यांचे घरापासून प्रताप शिंदे यांचे घराचे नैऋत्य कोप-यापर्यंत, प्रताप शिंदे यांचे घराचे नैऋत्य कोप-यापासून देविदास कासार यांचे घरापर्यंत, देविदास कासार यांचे घरापासून पश्चिमेकडे दगडू गोटीराम गायकवाड, रावसाहेब दादा गायकवाड ते श्रीरामपुर रोड चॉईस बाजारचे नैऋत्य कोप-यापर्यंत.
पश्चिम- चॉइस बाजार पासून श्रीरामपूर रस्त्याने उत्तरेकडे प्रवरा उजव्या कॅनॉल गट नंबर ५९३ चे नैऋत्य कोपऱ्यापर्यंत
*प्रभाग क्रमांक -१०*
लोकसंख्या-२८४१
व्याप्ती - गुंजाळ घुले वस्ती, वाळुंज खांदे वरती, जाधव वस्ती, हारगुडेवस्ती, धनवडे वस्ती, कदम वस्ती, चारी नं.४ चा दक्षिण बाजु परिसर.
उत्तर- गट नं.४७१ चे वायव्य कोप-या पासून कॅनालने गट नं.४६८ चे दक्षिण बांधापर्यंत, गट नं.४६८ चे दक्षिण बांधाने पुर्वेकडे चारी नं.४ टाकळीमियाँ रस्त्याने टाकळीमियाँ शिव गट नं. १२४ च्या ईशान्य कोप-या पर्यंत.
पुर्व - गट नं.१२४ टाकळीमियाँ, राहुरी शिवेने दक्षिणेकडे गट नं.२६५ चे आग्नेय कोपरा राहुरी शिवेपर्यंत.
दक्षिण- गट नं.२६५ चे आग्नेय कोप-या पासून राहुरी शिवेने पश्चिमेकडे गट नं.५३० गुंजाळ नाक्यापर्यंत.
पश्चिम गट नं.५३० गुंजाळ नाक्या पासून उत्तरेकडे कारखाना गाडीयार्ड रस्त्याने गट नं.४७१ चे वायव्य कोप-या पर्यंत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत