श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूरचे वरिष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबा वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब शंकराव आगे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूरचे वरिष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबा वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब शंकराव आगे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब आगे यांनी 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या dainik_jay_baba_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी व संबंधित एसडीपीओंचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या वृत्तात आरोपी गणेश मुंडे याचे नाव आले होते. त्यानंतर_ganesh._.mundhe_307 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे वृत्त डिलीट कर, नाहीतर तुला डिलीट करून टाकीन अशा आशयाचा धमकीचा संदेश आला आहे.
दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध पत्रकार संघटनांनी आरोपीस अटक करण्याची मागणी केली आहे.
श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, श्रीरामपूर उपविभाग पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवार सो, श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो.नि नितीन देशमुख यांनी यांना दैनिक जयबाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांना धमकी देणारा आरोपी जेरबंद करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत