देवळाली प्रवरा(वेबटीम) पार्वतीनंदन इंटरप्रायझेसच्या माध्यमातून देवळाली प्रवरा येथे एम.एच.१७ केक ऍण्ड बेकरी या नूतन दालनाचा आज रविवार १७ ऑगस्...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
पार्वतीनंदन इंटरप्रायझेसच्या माध्यमातून देवळाली प्रवरा येथे एम.एच.१७ केक ऍण्ड बेकरी या नूतन दालनाचा आज रविवार १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा. उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
एम.एच.१७ केक शॉपने ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्यानंतर बेकरी पदार्थची मागणी जोर धरू लागली असता बेकरी व्यवसायाचा आज शुभारंभ होत असून देवळाली प्रवरा सोसायटी डेपो श्रीरामपूर रोड येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.
माजी आ.चंद्रशेखर कदम व सौ.प्रियतमा कदम यांचे आशीर्वाद तर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व सौ.प्रीती कदम यांच्या हस्ते तसेच श्रमिक उद्योग समूह व नवले दूधचे सर्वेसर्वा साहेबराव नवले यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आदित्य डेरे उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आहे.
तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन सूर्यकांत निवृत्ती कदम, प्रकाश निवृत्ती कदम, सुमित प्रकाश कदम व कदम परिवाराने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत