कणगर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा चांदीचे नाणे व सन्मानचिन्ह देऊन गौरव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा चांदीचे नाणे व सन्मानचिन्ह देऊन गौरव

राहुरी(वेबटीम) भारताच्या  स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुरी तालुक्यातील कणगर येथील न्यू  प्रसाद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्व.चि अजय बाळास...

राहुरी(वेबटीम)



भारताच्या  स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुरी तालुक्यातील कणगर येथील न्यू  प्रसाद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्व.चि अजय बाळासाहेब घाडगे यांच्या स्मरणार्थ आरवी फाऊंडेशनच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाहिले ३ विद्यार्थ्याना सन्मान चिन्ह व चांदीची नाणे देऊन गौरविण्यात आले.


आरवी फाउंडेशनचे सर्वेसर्वा रविराज वरघुडे यांच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जाते.आजही  कणगर येथील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांचे मनोबल वाढविले आहे.


  या प्रसंगी कणगर गावचे सरपंच सर्जेराव घाडगे , सोसायटीचे चेअरमनअण्णासाहेब शेटे , प्रकाश नवले गुरू, प्रवीण नवले गुरू,शाळेचे मुख्याध्यापक श्री मुसळे सर तसेच आजी- माजी सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 


आरवी फाऊंडेशनच्यावतीने विजय  घाडगे, आकाश  धांबोरे, संकेत  शेटे , बाबुराव निमसे यांच्या हस्ते विद्यार्थ्याना समानीत करण्यात आले.


प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे

प्रथम क्रमांक (मुलीपैकी) - कु.मयुरी नामदेव नालकर (८८.४०%)

प्रथम क्रमांक -  कु.ओंकार संदीप गाढे (८८.४०%)

द्वितीय क्रमांक - कु . सुप्रिया दिलीप धामोरे (८७.२०%)  

तृतीय क्रमांक - कु . प्राची रमेश गाढे (८६.६०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत