पानेगाव(बाळासाहेब नवगिरे) नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समाजल्या जाणाऱ्या पानेगांव ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुरेश प्रल्हाद ...
पानेगाव(बाळासाहेब नवगिरे)
नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समाजल्या जाणाऱ्या पानेगांव ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुरेश प्रल्हाद जंगले यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठक पार पडली.अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते मुळाचे संचालक संजय जंगले हे होते.
ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी उपसरपंचपद निवडीसाठी सर्व कार्यक्रम सादर केला. एकमेव अर्ज सुरेंद्र प्रल्हाद जंगले यांचा आल्याने पिठासिन अधिकारी लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता भोसले /आंबेकर यांनी जंगले यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली लोकनेते सुनिलभाऊ गडाख यांनी पानेगांव ग्रामपंचायत दहापैकी आठ जागा बिनविरोध केल्या. व उपसरपंचपदाचा कालावधी रोटेशन पद्धतीने तीन गटाला दिड, दिड, व दोन वर्ष पदाचा कार्यकाळ ठरवून दिला होता पहिल्यांदा उपसरपंच दिड वर्ष पदाचा कार्यकाळ हनुमंत (दत्तात्रय)घोलप पूर्ण करुन राजीनामा ठरल्या प्रमाणे वरिष्ठांन कडे सादर करुन त्या उपसरपंच पदाच्या जागेवर सुरेश जंगले हे विराजमान झाले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य कुसुम शेंडगे, शांताबाई जंगले, दिपाली जंगले, रमेश जंगले,रंजना जाधव, चंद्रकला गुडधे,मिना जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, माजी उपसरपंच रामराजे जंगले,सतिश जंगले, नामदेव गुडधे,माजी सरपंच हौशाबापू जंगले,गंगाधर जंगले, किशोर जंगले, सुरज जंगले, अमित जंगले,चाचा जंगले,नारायण जंगले,पोपटराव पाटील संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जंगले उपाध्यक्ष दादासाहेब काकडे रमेश गुडधे, अर्जुन जंगले तानाजी गायकवाड,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जंगले, संचालक जालिंदर जंगले,राजेंद्र जंगले साहेबराव जंगले, दादासाहेब तनपुरे, मुकुंद घोलप, शिवाजी शेंडगे बाबासाहेब शेंडगे, गणेश गायकवाड, शुभम जंगले, रविंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर कल्हापुरे, राजेंद्र वाघमारे, बंडू जंगले,आण्णासाहेब जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे विक्रम जंगले, सुत्रसंचालन बाळासाहेब नवगिरे प्रस्ताविक किशोर जंगले आभार ज्ञानेश्वर जंगले यांनी मानले
नवनिर्वाचित उपसरपंच सुरेश जंगले यांचे अभिनंदन माजीमंत्री शंकरराव गडाख, सुनिता गडाख, लोकनेते सुनिलभाऊ गडाख युवानेते उदयन गडाख, जेष्ठ विधिज्ञ चंद्रकांत शिंदे, पशुधन अधिकारी डॉ भाऊसाहेब डौले, स्वयंभू लक्ष्मी माता देवस्थान अध्यक्ष रमेश जंगले,उद्योजक योगेश जंगले,पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील यांनी केले.
दिवंगत आमचे वडिल प्रल्हाद पि.के जंगले सर यांनी जवळपास तीस वर्षे सरपंच पद भूषविले पानेगांवच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून मुलभूत गरजा लक्षात घेऊन काम करणार असून तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना राबविण्यात येईल लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील मुळाचे संचालक संजय पाटील जंगले यांनी जो विश्वास दाखवला नक्कीच सार्थ ठरवेल
सुरेश (बबन साहेब) जंगले नवनिर्वाचित उपसरपंच पानेगांव ग्रामपंचायत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत