राहुरी(वेबटीम) जागतिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघटना (W.C.E.O) यांच्या वतीने दरवर्षी जगभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ...
राहुरी(वेबटीम)
जागतिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघटना (W.C.E.O) यांच्या वतीने दरवर्षी जगभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी कृषी व संशोधन क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल ब्राम्हणगाव भांड येथील के.एस.ऍग्रोचे प्रमोद गोवर्धन मुसमाडे यांची निवड मानद पदवीसाठी निवड करण्यात आली आहे.
ही सन्माननीय पदवी त्यांना येत्या १ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय केंद्र येथे प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा उपस्थित राहणार आहेत.
प्रमोद मुसमाडे केवळ २७ व्या वर्षी या प्रतिष्ठेच्या सन्मानासाठी पात्र ठरले असून, त्यांच्या कृषी संशोधनातील अभिनव उपक्रमांनी समाजात सकारात्मक बदल घडवले आहेत. या यशामागे गुरूजनांचे मार्गदर्शन, कुटुंबियांचा पाठिंबा आणि मोठ्यांचे आशीर्वाद मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमोद मुसमाडे हे ब्राम्हणगाव सोसायटीचे माजी चेअरमन गोवर्धन मुसमाडे यांचे सुपुत्र तर फोटोग्राफर बाळासाहेब व सीताराम मुसमाडे यांचे पुतणे आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत