(राहुरी : श्रेयस लोळगे) श्री शिवाजीनगर (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) – श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज, श्री शिवाजीनगर या विद्याल...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
श्री शिवाजीनगर (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) – श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज, श्री शिवाजीनगर या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री उत्तम हनुमंता खुळे (M.A., B.Ed., D.S.M.) हे नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यासाठी उद्या रविवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १२:३० वाजता सेवानिवृत्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री अरुण बाबुराव तनपुरे (चेअरमन, डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि., श्री शिवाजीनगर) भूषवणार आहेत, तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर (मठाधिपती, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, नेवासा) यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरही या समारंभात उपस्थित राहणार आहेत.
प्राचार्य श्री खुळे सरांनी गेल्या अनेक वर्षांत आपल्या कार्यकाळात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी झपाट्याने कार्य केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व नैतिक घडणीकडे लक्ष देत त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी बजावली आहे.
हा समारंभ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज, श्री शिवाजीनगर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे संपन्न होणार असून, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत