राहुरी(वेबटीम ) दा नांग, व्हिएतनाम येथे टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सतर्फे आयोजित MDRT Training Conclave मध्ये गुहा येथील रहिवाशी व टाटा एआयए लाइ...
राहुरी(वेबटीम)
दा नांग, व्हिएतनाम येथे टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सतर्फे आयोजित MDRT Training Conclave मध्ये गुहा येथील रहिवाशी व टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनीचे चीफ लाईफ प्लॅनर प्रशांत चंद्रभान वाबळे यांना MDRT 2024 Trophy ने सन्मानित करण्यात आले.
MDRT (Million Dollar Round Table) हा जीवन विमा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोच्च सन्मान असून, हा मान मिळविणारे सल्लागार अत्यंत प्रतिष्ठित दर्जाचे मानले जातात. श्री. प्रशांत वाबळे यांची निवड या प्रशिक्षण संमेलनासाठी झाली होती आणि २० ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी सिद्धार्थ वाबळे हेही उपस्थित होते.
टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने सलग तिसऱ्या वर्षी भारतातील सर्वाधिक 2871 MDRT सल्लागार घडवण्याचा मान मिळवला आहे.
गेल्या १७ वर्षांपासून जीवन विमा व आरोग्य विमा क्षेत्रात प्रामाणिक व पारदर्शक काम करत असलेले श्री. प्रशांत वाबळे हे आयआरडीए प्रमाणित विमा प्रतिनिधी आहेत. २०२४ कॅलेंडर वर्षात त्यांनी तब्बल ११५ कुटुंबांना रूपये ७५ कोटींचा लाइफ इन्शुरन्स कव्हर देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित केले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशामागे टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनीचे ब्रॅच मॅनेजर श्री. शहाणे व रोहित शिंदे ₹ तसेच ओंकार असोसिएट्सचे विजय वाळके व कल्पना वाळके, प्रसाद वाळके यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत