(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी येथील जैन स्थानकात पर्युषण पर्व मोठ्या भक्तिभावात व धार्मिक उत्साहात साजरे करण्यात आले. दिनांक 20 ऑगस्ट 2025 ...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
राहुरी येथील जैन स्थानकात पर्युषण पर्व मोठ्या भक्तिभावात व धार्मिक उत्साहात साजरे करण्यात आले. दिनांक 20 ऑगस्ट 2025 ते 27 ऑगस्ट 2025 या काळात पार पडलेल्या या पर्वात अनेक श्रद्धाळूंनी विविध प्रकारच्या तपश्चर्या पूर्ण करत अध्यात्मिक साधनेचा नवा उच्चांक गाठला.
सध्या राहुरी येथे प.पू. महासती अर्चनाजी म.सा., प.पू. पायलजी म.सा., प.पू. प्रियांकाजी म.सा., प.पू. पारसश्रीजी म.सा. आणि प.पू. क्रियांशाजी म.सा. या पाच साध्वीजींचा चातुर्मास सुरु आहे. या पावन पर्वात मोहितभाई लोढा यांनी 31 उपवास करत मासखमण साध्य केले, तर सौ. संगीताबेन सुराणा यांनी 28 उपवास पूर्ण करत त्यांचीही मासखमनकडे वाटचाल सुरु आहे.
त्याचप्रमाणे तीर्थेशभाई सुराणा, हर्षभाई चोरडिया व डॉ. सौ. रुचीबेन राका यांनी प्रत्येकी 11 उपवास केले असून श्री अनिलजी सुराणा, ईश्वरजी सुराणा व सौ. शिल्पाबेन राका यांनी प्रत्येकी 9 उपवास केले. श्रीमती विमलबाई खाबिया, सचिनजी हिरण, पुष्करजी मुथा, राकेशजी राका, सौ. सुनीताबेन लोढा, कुमारी प्रसादी खाबिया यांनी प्रत्येकी 8 उपवास तर सौ. सोनालीबेन नहार यांनी 5 आणि कुमारी श्रुतीबेन मुथा यांनी 4 उपवास केले. या पर्वात एकूण 34 तृतीय तप पूर्ण झाली असून अनेक तपस्वींच्या पुढील तपश्चर्या सध्या सुरु आहेत.
रोज सकाळी 6.45 ते 7.45 या वेळेत महावीर कॉलेजतर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन होत असून यामध्ये दररोज 45 ते 50 जण सहभागी होत आहेत. त्यानंतर सकाळी 9 ते 10 दरम्यान परमपूज्य महासतीजींच्या सुमधुर व व्यावहारिक व्याख्यानांना संपूर्ण जैन समाजाचा भरघोस प्रतिसाद लाभतो आहे.
या चातुर्मासाचे यशस्वी आयोजन चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष श्री. पारस राका व सेक्रेटरी श्री. संतोषकुमार लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. यासाठी किरण सुराणा, आशिष मुथा, वर्धमान पारख, प्रशांत नहार, जितेंद्र लुक्कड व इतर पदाधिकारी तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळींचा मोलाचा सहभाग आहे. भोजन व्यवस्थेसाठी संजय सुराणा, सुनील सुराणा, ताराचंद राका व सुनील राका यांनी उत्कृष्ट व्यवस्था केली.
दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी दरवर्षीप्रमाणे सामुदायिक ‘खमतखामणा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी राहुरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार मा. प्रसाद तनपुरे, माजी नगराध्यक्ष सौ. उषाताई तनपुरे, तसेच राहुरी कारखान्याचे संचालक व तालुक्याचे युवा नेतृत्व श्री. हर्ष तनपुरे यांची विशेष उपस्थिती लाभली. सर्व कार्यक्रमांचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. अनिल सुराणा यांनी केले.
या पवित्र पर्वामुळे राहुरीतील जैन समाजात धार्मिक ऊर्जा, आत्मसंयम व सामूहिक एकात्मतेचा सुंदर अनुभव मिळाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत