(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरीतील खड्यांचे साम्राज्य हटवून नागरिकांना दिलासा द्या; युवा नेते अक्षय कर्डिले यांनी दिल्या मुख्याधिकाऱ्यांना स्...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
राहुरीतील खड्यांचे साम्राज्य हटवून नागरिकांना दिलासा द्या; युवा नेते अक्षय कर्डिले यांनी दिल्या मुख्याधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
राहुरी शहर आणि उपनगरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता आगामी गणेश उत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने मुरमीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे केली.
या मागणीची गंभीर दखल घेत युवा नेते अक्षय कर्डिले यांनी राहुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना संबंधित रस्त्यांचे मुरमीकरण तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यातच उत्सव काळात वाढणारी वर्दळ लक्षात घेता अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील मार्गिकांचे मुरमीकरण तातडीने करावे अशी मागणी करण्यात आली आहे:
1. तनपुरेवाडी ते शेळके वस्ती
2. राहीआई मंदिर ते बाराभाई मळा
3. मेहेत्रे मळा ते पवार मळा
4. शिवाजी डौले यांच्या वस्तीपासून काळे आखाडा पुलापर्यंतचा पाट रस्ता
5. अमोल हारदे ते काळे आखाडा रस्ता
6. राहुरी कॉलेज रस्ता ते येवले आखाडा रस्ता
7. वराळे वस्ती आणि जोगेश्वरी आखाडा येथील अंतर्गत रस्ते
तसेच संपूर्ण शहरातील खड्डे बुजवून रस्त्यांचे मुरमीकरण करावे, अशीही स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.
या वेळी भाजपा राहुरी तालुका मंडळ अध्यक्ष विक्रम भुजाडी, उमेश शेळके, विजय जाधव, सचिन मेहेत्रे, किशोर येवले, सतीश फुलसौंदर, दत्तू गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत