राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गणेगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी...
राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गणेगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी भागवत कोबरणे यांची तर व्हा चेअरमन पदी भाऊसाहेब कोबरणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून राहुरीचे सहाय्यक निबंधक खेडकर यांच्या उपस्थितीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. चेअरमन पदाची सूचना कैलास कोबरणे यांनी तर व्हा. चेअरमन पदाची सूचना रखमाजी हार्दिक यांनी मांडली सोसायटीची एकूण सदस्य संख्या बारा आहे दोन सदस्य जागा रिक्त आहे.
यावेळी सदस्य विजय कोबरने, अंजाबापू कोबरणे, रोहिदास कोबरणे, विलास लांहूंडे, लिलाबाई कोबरणे, सुनिता कोळसे यांच्यासह दत्तात्रय कोबरणे, बाबासाहेब कोबरणे, गंगाधर कोबरणे, बाळासाहेब कोबरणे, आदिनाथ कोबरने, पोपट कोबरणे, किशोर कोबरने, बबलू कोबरणे, सुरेश कोबरणे, हरिभाऊ कोबरणे,काकासाहेब कोबरणे, बाबासाहेब उर्हे भारत कोबरणे, बापू कोबरने, शिवाजी कोळसे, ज्ञानेश्वर कोबरणे, संदीप कोबरणे, ऋषिकेश कोबरणे, किरण कोबरणे, सुरेश लाहूंडे, विजय ओहळ, सोसायटीचे सचिव भाऊसाहेब राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
नूतन चेअरमन, व्हा.चेअरमन यांचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवाजीराव कर्डिले, माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील, युवा नेते अक्षय कर्डिले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, सरपंच सौ.शोभाताई भनगडे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत