राहुरी शहर(श्रेयश लोळगे) राहुरी शहरातील मानाचा पहिला गणपती आझाद मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षपदी अमृत कैलास दहिवाळकर उपाध्यक्षपदी गणेश संजय ढोले त...
राहुरी शहर(श्रेयश लोळगे)
राहुरी शहरातील मानाचा पहिला गणपती आझाद मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षपदी अमृत कैलास दहिवाळकर उपाध्यक्षपदी गणेश संजय ढोले तर सचिवपदी भैय्या गायकवाड यांचे एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या नागपंचमीच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद प्रदीप गाडेकर होते.
आझाद मंडळ ट्रस्टला मोठा इतिहास आहे, मंडळाची स्थापना शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींनी केली होती.
मंडळाकडून दरवर्षी सामाजिक, धार्मिक आणि अध्यात्मिक उपक्रम राबविले जात असल्याने या मंडळाची ओळख सर्वात वेगळी आहे. शहरातील अनेक दिग्गजांनी या मंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
यावेळी अमृत दहिवाळकर म्हणाले राहुरीचा मानाचा गणपती असल्याने मंडळाला सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी, पदाधिकाऱ्यांचे,पोलीस प्रशासनाचे,व्यापारी वर्गाचे, सर्व समाज बांधवांचे, नेहमी सहकार्य असते,याही वर्षी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली. तसेच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक निर्णय घेतले जातील असे आश्वासन त्यांनी दिले.
यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या युवकांनी केला आहे. नव्या कार्यकारणी मध्ये, अमृत कैलास दहिवाळकर अध्यक्ष, गणेश ढोले उपाध्यक्ष,अभिजित राऊत खजिनदार, संपत दाभाडे उपखजिनदार, तर सचिव म्हणून भैय्या गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी प्रदीप गाडेकर, बंडूशेठ दहिवाळकर,संतोष पोपळघट,सुनील राऊत,भीमराज रणसिंग,गोविंद दहिवाळकर, कृष्णकांत पोपळघट, राहुल घुले,आकाश लांडगे, बबलू तोडमल,अनिल गुंजाळ राजेंद्र गुंजाळ,अमोल रणसिंग, गणेश खैरे,अमोल काशीद,रवी गुंजाळ, लखन राऊत, स्वप्निल राऊत, अभिजीत नरवडे,यश पोपळघट,प्रथमेश पोपळघट, प्रज्वल खैरे,अक्षय खैरे,ओम पोपळघट,विकी गुंजाळ, सुनील पगारे, यश खैरे, विलास नवरे, अविनाश वडतीले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत